Crypto Investors : क्रिप्टो गुंतवणुकदारांवर निराशेचं ढग, 24 तासांत 17% घसरण; आतापर्यंतचा सर्वाधिक नीच्चांक

केवळ बिटकॉईनच नव्हे तर अन्य क्रिप्टोकरन्सीत देखील घसरण नोंदविली गेली. इशिरियम, बिनान्स आणि एक्सआरपीत देखील 12-14 टक्क्यांची घसरण झाली.

Crypto Investors : क्रिप्टो गुंतवणुकदारांवर निराशेचं ढग, 24 तासांत 17% घसरण; आतापर्यंतचा सर्वाधिक नीच्चांक
केवळ बिटकॉईनच नव्हे तर अन्य क्रिप्टोकरन्सीत देखील घसरण नोंदविली गेली.
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 9:08 PM

नवी दिल्ली क्रिप्टोकरन्सीच्या जगतात (Crypto currency) नकारात्मक व्यवहाराचं ढग गडद झाले आहे. जागतिक अर्थपटलावरील घडामोडींमुळे क्रिप्टोकरन्सीच्या भाव घसरणीला लागले आहे. आज (मंगळवारी) बिटकॉईन्सच्या भाव 17 टक्क्यांच्या घसरणीसह 22000 डॉलरच्या स्तरावर पोहोचला. बिटकॉईनच्या पडझडीमुळे कोट्यावधी गुंतवणुकदारांना (Invetors) अरबो रुपयांवर पाणी फेरावं लागलं आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून बिटकॉईनच्या दरात पडझड सुरु आहे. आज घसरणीनं उच्चांक गाठला. डिसेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच बिटकॉईन दर 25000 डॉलरच्या खाली पोहोचले आहे. अर्थजाणकारांच्या मते बिटकॉईन (Bitcoin) गुंतवणुकदारांसमोर अ्स्थिरतेचं सावट आहे. गेल्या 24 तासांत बिटकॉईनच्या किंमती 25000 डॉलरच्या खाली पोहोचल्या आहेत. केवळ बिटकॉईनच नव्हे तर अन्य क्रिप्टोकरन्सीत देखील घसरण नोंदविली गेली. इशिरियम, बिनान्स आणि एक्सआरपीत देखील 12-14 टक्क्यांची घसरण झाली. आतापर्यंतच्या व्यवहाराच्या इतिहासात बिटकॉईन व इथिरियमचे दर सर्वोच्च किंमतीपेक्षा तब्बल 75 टक्क्यांनी घसरले आहेत.

घसरणीचं सत्र:

गेल्या सात दिवसांच्या आकड्यांचा विचार केल्यास बिटकॉईनमध्ये एकूण 28 टक्क्यांची घसरण झाली आहे. इथिरियम 14 टक्क्यांच्या घसरणीसह 1175 डॉलर आणि बिनान्स 12 टक्क्यांच्या घसरणीसह 215 डॉलरवर पोहोचला आहे. भारताचा क्रिप्टो एक्स्चेंज वजीरएक्सवर क्रिप्टोकरन्सी डाटा वॉल्यूम 5 अरब होता. चालू वर्षी त्यामध्ये मोठी घट झाली असून 2 अरब वर पोहोचला आहे. भारतात क्रिप्टो व्यवहारांवर कर आकारणीच्या निर्णयानंतर ट्रेडिंग संख्येत घट झाली आहे. गेल्या अर्थसंकल्पात क्रिप्टो व्यवहारावर 30 टक्के कर व टीडीएस आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता.

पैसे काढण्याला ब्रेक:

जागतिक अर्थकारणाच्या अभ्यासकांच्या मते इक्विटी आणि क्रिप्टोकरन्सीत सातत्याने घसरण नोंदविली जात आहे. बलाढ्य क्रिप्टो एक्स्चेंज बिनान्स आणि सेल्सियसने गुंतवणुकदारांना पैसे काढण्यावर बंदी घातली आहे आणि क्रिप्टो संबंधित अन्य कंपन्यांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये शेअर बाजाराच्या तुलनेत अधिक घसरण होत आहे.

कमी दिवसात, अधिक रिटर्न!

जगभरातील युवा गुंतवणुकदारांनी बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीकडं मोर्चा वळविला होता. कमी कालावधीत अधिक परताव्याच्या लाभामुळं क्रिप्टो अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. महागाईचं वाढतं प्रमाण आणि मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थांचा दर यामुळे क्रिप्टो वर्तृळात गुंतवणुकदारांचा उत्साह दिवसागणिक मावळला. भारतात क्रिप्टो व्यवहारावर कर आकारणीच्या निर्णयामुळं क्रिप्टो मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा ओघ सुरू झाला.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.