2011 मध्ये 100 रुपये गुंतवले असते तर आता 1.65 कोटी झाले असते? कोणती होती ती गुंतवणूक
Investment: 2011 मध्ये बिटकॉइनची किंमत फक्त $1 होती. म्हणजे फक्त 45.50 रुपये होती. त्यावेळी तुम्ही 100 रुपयांना 2.22 बिटकॉइन खरेदी करू शकता. आता एक बिटकॉइन $100,000 मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच 13 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या 2.22 बिटकॉइनची किंमत आता 1.65 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
Bitcoin All Time High: अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत क्रिप्टोकरेन्सी बिटकॉइनची चर्चा सुरु झाली. या निवडणुकीनंतर बिटकॉइनच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली. बिटकॉइनने मागील 13 वर्षांत जितके रिर्टन दिले ते समजल्यावर तुम्हाला धक्का बसणार आहे. जर एखाद्याने 2011 मध्ये बिटकॉइनमध्ये केवळ 100 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यांचे किती रुपये झाले असते? हे सांगितल्यावर तुम्हाला धक्का बसणार आहे. 2011 मधील ती 100 रुपयांची गुंतवणुकीचे मूल्य आता 1.65 कोटी रुपये झाले असते.
वर्षभरात बिटकाईन दुप्पट
बिटकॉइन 2009 मध्ये लॉन्च झाला होता. त्यावेळी त्याची किंमत शून्य होती. 2024 मध्ये त्याची कीमत 1 कोटी रुपये झाली. पाच डिसेंबरला बिटकॉइनची किंमत $100,000 (जवळपास 82.43 लाख रुपये) झाली. बिटकॉइनने इतिहासात प्रथमच ही पातळी गाठली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यापासून या क्रिप्टो करन्सीची किंमत सातत्याने वाढत आहे. चार आठवड्यांत त्याची किंमत 45 टक्क्यांनी वाढली आहे. जर आपण गेल्या वर्षभराची कामगिरी पाहिली तर बिटकॉइनची किंमत 100 टक्क्यांनी वाढली आहे.
आता ते करोडपती
2011 मध्ये बिटकॉइनची किंमत फक्त $1 होती. म्हणजे फक्त 45.50 रुपये होती. त्यावेळी तुम्ही 100 रुपयांना 2.22 बिटकॉइन खरेदी करू शकता. आता एक बिटकॉइन $100,000 मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच 13 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या 2.22 बिटकॉइनची किंमत आता 1.65 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. म्हणजेच 100 रुपये बिटकॉइनमध्ये गुंतवणारी व्यक्ती आज करोडपती आहे.
कोरोना काळात बिटकॉइनची किंमत वाढली
2020 मध्ये कोरोना काळ बिटकॉइनसाठी खूप चांगले ठरले होते. वर्षाच्या सुरुवातीला बिटकॉइनची किंमत $7,100 होती. वर्षाच्या अखेरीस ते $29,000 च्या जवळपास पोहोचले होते. म्हणजे बिटकॉइनची किंमत 400% वाढणार आहे. 2021 मध्ये बिटकॉइनने नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर जानेवारीमध्ये $40,000 वर बिटकॉइन पोहोचले. एप्रिलपर्यंत $60,000 चा टप्पा ओलांडला. मात्र, त्यानंतर 2022 आणि 2023 मध्ये बिटकॉइनची चमक कमी झाली. 2022 च्या अखेरीस ते $20,000 च्या खाली आले आणि 2023 च्या सुरुवातीला $16,530 वर घसरले होते.