Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका

Stock Market Crash : शेअर बाजारात जोरदार विक्रीने अखरेच्या सत्रात गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा झटका बसला. गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले.

Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका
ब्लॅक फ्रायडे
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 5:21 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज ब्लॅक फ्राईडेने (Black Friday) गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी होती. त्यानंतर आज शुक्रवारी, 27 जानेवारी 2023 रोजी बाजाराचा मूड अचानक स्वींग झाला. अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरु झाल्याने बाजाराचा मूड बिघडला. बाजारात भीतीने आक्रमण केले आणि धडाधड विक्री सत्र सुरु झाले. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफ्याची चक्री फिरवली. त्यामुळे निर्देशांक 60,000 अंकाहून खाली आला. एकावेळी तर सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला. शेअर बाजार बंद झाल्यावर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 1.45 टक्के, 874 अंकांच्या घसरणीसह 5930 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीत (Nifty) 400 अंकांची घसरण झाली. निफ्टी 287 अंकांच्या घसरणीसह 17,604 अंकावर बंद झाला.

बाजारातील या पडझडीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. बीएसईवर सुचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप घसरुन 269.74 लाख कोटी रुपयांवर आले. बुधवारी कंपन्यांचे एकूण भांडवल 276.69 लाख कोटी रुपये होते. म्हणजे आजच्या सत्रात कंपन्यांचे 6. 95 लाखांचे नुकसान झाले. तर दोन व्यापारी सत्रात गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा फटका बसला.

आजच्या व्यापारी सत्रात टाटा मोटर्सचा शेअर 6.34 टक्के, आयटीसी 1.77 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.71 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.51 टक्के, एनटीपीसी 0.21 टक्के, सन फार्मा 0.08 टक्क्यांसह बंद झाला.

हे सुद्धा वाचा

तर ब्लॅक फ्रायडेच्या लाटेत इतर दिग्गजांनाही फटका बसला. एसबीआय 5.01 टक्के, आयसीआयसीआय बँक 4.41 टक्के, इंडसइंड बँक 3.43 टक्के, अॅक्सिस बँकेत 2.07 टक्के, कोटक महिंद्रामध्ये 2.03 टक्के, टेक महिंद्रा 1.97 टक्क्यांची घसरण झाली.

आजच्या व्यापारी सत्रात अनेक सेक्टरला फटका बसला तर या पडझडीत काही क्षेत्रांनी कमाल कामगिरी केली. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात दिग्गज कंपन्या झोपल्या तर काहींनी गुंतवणूकदारांचा फायदा केला. बँकिंग सेक्टर, आयटी, पीएसयू बँक, आर्थिक सेवा, मेटल्स, मीडिया, ऊर्जा, इन्फ्रा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरच्या शेअरमध्ये घसरण झाली.

तर ऑटो, फार्मा, एफएमसीजी आणि हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक्समध्ये मोठी तेजी दिसून आली. निफ्टीतील 50 शेअरमधील 13 शेअर तेजीसह बंद झाले. 37 शेअरमध्ये पडझड झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअरमध्ये तेजी तर 22 शेअरमध्ये घसरण झाली.

25 जानेवारी 2023 शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये जवळपास 773.69 अंकांची घसरण झाली होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 60205.06 अंकावर बंद झाला होता. तर 226.30 अंकांची घसरण होऊन निफ्टी 17892.00 अंकावर बंद झाला होता.

बीएसईमध्ये एकूण 3,646 कंपन्या ट्रेडिंग करतात. त्यातील जवळपास 1,136 कंपन्यांचे शेअर तेजीत होते. तर 2,378 शेअर घसरणीसह बंद झाले होते. तर 132 कंपन्यांच्या शेअरमध्ये कोणताही फरक पडला नव्हता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.