Blue Star Share : ब्लू स्टार कंपनीने केली कमाल, गुंतवणूकदारांना 188 टक्के रिटर्न
Blue Star Share : बाजारात अनेक शेअर दमदार कामगिरी करत आहे. त्यापैकी या शेअरने अवघ्या तीनच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कोणता आहे हा शेअर?
नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) सध्या तेजीचे सत्र सुरु आहे. बाजार दिवाळीपूर्वीच कमाल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक शेअर तडाखेबंद कामगिरी बजावत आहेत. त्यात ब्लू स्टार कंपनीने (Blue Star Company) पण आघाडी उघडली आहे. हा शेअर सध्या सूसाट आहे. गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक या शेअरने गाठला आहे. या स्टॉकने 188 टक्के परतावा दिल्याने गुंतवणूकदारांना हर्षवायू झाला आहे. जगभरात या कंपनीचा कारभार पसरला आहे. आफ्रिका, आशिया, युरोप, अमेरिकेसह पाच ही खंडात या कंपनीचा व्यापार पसरला आहे. या शेअरने अवघ्या तीनच वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. काय करते ही कंपनी
काय करते कंपनी
ब्लू स्टार कंपनी, एअर प्युरीफायर, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर, कोल्ड स्टोरेज आणि इतर खास आयटम तयार करते. ही कंपनी मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, प्लबिंग आणि फायरफाईटिंग प्रकल्प राबविते. त्यात अनेक कंपन्यांना सहायता करते. या कंपनीचा कारभार मध्य पूर्व, आफ्रिका, सार्क आणि आशियान क्षेत्रात पसरलेला आहे. जगातील 18 देशात ही कंपनी निर्यात करते. कतार आणि मलेशियामध्ये ही कंपनी संयुक्त उपक्रमातंर्गत विभिन्न क्षेत्रात काम करते. ब्लू स्टारने आर्थिक वर्ष 2023 मध्ये अमेरिका, युरोप आणि जपान या देशात त्यांच्या मालकीच्या सहायक कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपनीची विस्तार योजना अजूनही सुरुच आहे.
काय सांगतो तिमाही निकाल
ब्लू स्टार लिमिटेडने त्यांचा या आर्थिक वर्षातील निकाल (Q1FY24) जाहीर केला. कंपनीच्या विक्रीत 12.6% वृद्धी आली आहे. ही वृद्धी 2,262 कोटी रुपये होती. तर कंपनीचा ऑपरेशनल्स फायदा 17.9% टक्के वाढून 145 कोटी रुपये झाला. तर कंपनीला निव्वळ नफा 12.2% वाढला. कंपनीला 83 कोटींचा निव्वळ नफा झाला. याशिवाय कंपनी गेल्या 3 वर्षांच्या विक्रीत 14% (CAGR) वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्यात 24% वाढ झाली आहे.
जोरदार परतावा
ब्लू स्टार कंपनीने गेल्या एका वर्षात 68% तर तीन वर्षांत 188% चा जोरदार परतावा दिला आहे. याशिवाय कंपनीचा ROCE 24.5% आणि ROE 23.4% आहे. बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये 15% तेजी दिसून आली. सध्या हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. हा शेअर 920 रुपयांच्या घरात आहे. या शेअरच्या व्हॅल्यूममध्ये 11.03 पट अधिक तेजी दिसून आली. गुंतवणूकदार या शेअरवर नजर ठेऊन आहेत.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.