बीएमडब्ल्यूचं मिशन इंडिया : नवं आर्थिक वर्ष मोक्याचं, 24 नव्या गाड्याचं लाँचिंग

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या आकड्यावरून समाधानकारक चित्र निर्माण झालं आहे. चार चाकी वाहनं कंपन्यांच्या विक्रीत 25 टक्के आणि दोन चाकी वाहनांच्या विक्रीत तब्बल 41 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. आघाडीची वाहन निर्माता समूह बीएमडब्ल्यू भारतीय वाहन बाजारात नवीन 24 वाहने उतरविण्याच्या तयारीत आहे.

बीएमडब्ल्यूचं मिशन इंडिया : नवं आर्थिक वर्ष मोक्याचं, 24 नव्या गाड्याचं लाँचिंग
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 6:06 PM

नवी दिल्ली : कोविड संकटामुळे वाहन उद्योग (AUTOMOBILE SECTOR) निर्मिती कंपन्यांना मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. सेमीकंडक्टरचा तुटवडा, यूक्रेन-रशिया युद्धाचा (UKRANE-RUSSIA CRISIS) देखील वाहन निर्मिती उद्योगाला मोठा फटका बसला. मात्र, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या आकड्यावरुन समाधानकारक चित्र निर्माण झालं आहे. चार चाकी वाहन कंपन्यांच्या विक्रीत 25 टक्के आणि दोन चाकी वाहनांच्या विक्रीत तब्बल 41 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. आघाडीची वाहन निर्माता समूह बीएमडब्ल्यू भारतीय वाहन बाजारात नवीन 24 वाहने उतरविण्याच्या तयारीत आहे. यापैकी 19 वाहन चारचाकी प्रकारतील आहेत. आगामी मे महिन्यात इलेक्ट्रॉनिक सेडान (ELECTRONIC SEDAN) आय-4 बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. याव्यतिरिक्त बीएमडब्ल्यू पाच नवीन मोटारसायकल बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे.

विक्रीत वाढ

चालू वर्षाचा जानेवारी ते मार्च महिन्याचा कालावधी बीएमडब्ल्यू समूहासाठी फायदेशीर ठरला आहे. गत तिमाहीत कंपनीच्या चार चाकी वाहनांची विक्री टक्केवारीत 25.3% आणि विक्री संख्येत 2,815 ने वाढ नोंदविली गेली आहे. बीएमडब्ल्यूच्या सेडान आणि एसयूव्हीची विक्री 2,636 आणि मिनी लक्झरी कॉम्पॅक्ट कारची विक्री 179 वर पोहोचली.

विक्री दुप्पटीनं वाढणार

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी कंपनीच्या विक्री धोरणावर भाष्य केलं आहे. सध्या कंपनीकडे चार चाकी वाहनांसाठी 2500 आणि मोटारसायकल साठी 1500 हून अधिक ऑर्डरची नोंदणी करण्यात आली आहे. सध्या वाढीव मागणीचा विचार करता कंपनीच्या विक्रीत दुप्पटीनं वाढ होण्याची शक्यता असल्याचं बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

किंमतीसोबत गुणवत्ता

बीएमडब्ल्यू चार चाकी अलिशान वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी समजली जाते. बीएमडब्ल्यूची कार घेणं अनेकांसाठी स्वप्नवत ठरतं. महागड्या किंमतीसोबत गुणवत्तापूर्ण निर्मिती वैशिष्ट्यासाठी बीएमडब्ल्यूची ओळख आहे. बीएमडब्ल्यू वाहनांच्या निर्मितीवेळी गुणवत्तेकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाते आणि वाहनांच्या निर्मितीसाठी उच्च दर्जाच्या साहित्याचा देखील वापर केला जातो.

संबंधित बातम्या

पडताळणी: ‘इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलची कमी दरवाढ’ पेट्रोलियम मंत्र्यांच्या दावा खरा की खोटा?

ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ… हे फॅक्टर ठरताय कारणीभूत

जगातील सर्वाधिक महाग ‘एलपीजी’ भारतामध्ये; तो कसा? समजून घ्या त्यामागचे गणित

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.