शेअर बाजारात गुंतवणूक करायचा विचार करताय, तर ही बातमी तुमच्या कामाची !
शेअर बाजारात पैसा कमावण्याची मोठी संधी निर्माण होताना दिसतेय. 2021 च्या शेवटपर्यंत सेन्सेक्स 50,500 अंक एवढ्या रेकॉर्डवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबई : फ्रान्सची ब्रोकरेज कंपनी बीएनपी परिबाने भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा अंदाज वर्तवला आहे. त्यांना आशा आहे की, बीएसईचा 30 शेअरवाला सेंसेक्स (Sensex) 2021 च्या शेवटपर्यंत 9 टक्क्याने वाढेल. तो 50,500 पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. बीएनपीला वाटतं की भारतीय बाजार हा मोठा होत चालला आहे आणि त्याची शेअर बाजाराला मदत होतेय. पण कंपनीने काही मुद्यांवर चिंताही व्यक्त केलीय. त्यात शहरी लोकांच्या उत्पन्नात होत असलेली घट, वाढती महागाई आणि बँकांच्या बॅलन्स शीटवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांचा समावेश आहे. (BNP Paribas Expects Sensex To Touch 50,500 By 2021 Year End)
30 एप्रिलपासून 70 टक्के वाढला शेअर बाजार
कोरोना महामारीमुळे सुरुवातीच्या काळात भारतीय शेअर बाजार हा 30 टक्क्याने घसरलेला होता. पण त्यानंतर भारतीय बाजारात सुधारणा पहायला मिळाली. परिणामी शेअर बाजार हा एप्रिलपर्यंत 70 टक्क्यांपर्यंत वाढला.
गुंतवणूकदारांना काय वाटतं?
जागतिक बाजारात तेजी आल्यामुळेच भारतीय बाजारातही त्याचे पडसाद पहायला मिळत असल्याचं मत भारतीय गुंतवणूकदार व्यक्त करतायत. भारतीय शेअर बाजारातले रेकॉर्ड हे जागतिक तेजीचा परिणाम असल्याचंही जाणकार म्हणतायत. पण भारतीय अर्थव्यवस्थेचा दीर्घकालीन विचार करुनच यावर डाव लावणं शहाणपणाचं असल्याचा इशाराही ते देतायत. काही मोजक्या शेअर्सवरच लक्ष दिलं जात असल्यानं जाणकार चिंतीत आहेत.
भारताला दोन बाजूने लाभ !
शेअर्सच्या निवडीचा जो सवाल आहे तो दोन पद्धतीने भारताला मदत करत असल्याचं बीएनपी परिबाच्या विश्लेषकांना वाटतं. मोठे शेअर्स हे आणखी मोठे होतायत आणि गुणवत्ता असलेले शेअर्स इतर आशियाई बाजारांच्या तुलनेत इथं अधिक उपलब्ध आहेत. भारतात आर्थिक स्थिती उंचवण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचंही बीएनपी परिबाला वाटतं. रेल्वे, सिमेंट कंपन्या, वाहनांची वाढती विक्री हे अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे बिंदू सकारात्मक असल्याची नोंदही केली जातेय.
संबंधित बातम्या :
अर्थव्यवस्थेला झळा लागण्यास सुरुवात, शेतकरी आंदोलनामुळे रोज 3500 कोटींचे नुकसान
नोकरी करताय, जाणून घ्या कोणत्या गोष्टींवरचा खर्च ठरतो इनकम टॅक्स फ्री
(BNP Paribas Expects Sensex To Touch 50,500 By 2021 Year End)