Modi 3.0 Return : देशात सत्तेवर मोदी 3.0 येणार, ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलचा हे 21 स्टॉक घेण्याचा सल्ला

Modi 3.0 Return : सातव्या टप्प्याच मतदान अजून बाकी आहे पण ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलने सत्तेवर कोण येणार? भाजपाप्रणीत NDA ला किती जागा मिळणार? त्याचे आकडे समोर आले आहेत. ब्रोकरेज फर्मने सत्ताकल लक्षात घेऊन वर्षभरासाठी कुठे स्टॉक घ्यायचे? ते सुद्धा सुचवलं आहे. मागच्या दोन टर्मपासून देशात नरेंद्र मोदींच सरकार सत्तेवर आहे.

Modi 3.0 Return : देशात सत्तेवर मोदी 3.0 येणार, ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलचा हे 21 स्टॉक घेण्याचा सल्ला
narendra modi
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 1:53 PM

येत्या 1 जूनला शेवटच्या सातव्या टप्प्यात मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे जाहीर होतील. म्हणजे कोणाच सरकार येणार? ते चित्र कळेल. एक्झिट पोलचे आकडे आतापर्यंत फार कमीवेळा चुकले आहेत. त्यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. देशात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये सामना आहे. 4 जूनच्या निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मात्र, त्याआधी ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलने सत्तेवर कोण येणार? भाजपाला किती जागा मिळणार? या बद्दल आपले अंदाजित आकडे जाहीर केले आहेत. निवडणूक निकालाचा शेअर बाजारावर सुद्धा खूप गंभीर परिणाम होतो. कारण सरकार बदलल्यानंतर धोरण बदलतात. गुंतवणूकीवर परिणाम होतो. त्यामुळे शेअर बाजाराचही लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाकडे बारीक लक्ष आहे.

निकालाच्या दृष्टीने गुंतवणूकदारांना कुठल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायची? दूरगामी फायद्याचे ठरतील असे कुठले स्टॉक्स आहेत? त्याची माहिती हवी आहे. ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलने निवडणूक निकालाआधी असे 21 स्टॉक सांगितले आहेत, ज्यातून पुढच्या काही दिवसात चांगले रिर्टन येऊ शकतात. ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलनुसार, भाजपा 2024 मध्येही आपली सत्ता कायम राखेल. 4 जूनला जाहीर होणाऱ्या निकालात भाजपाला 299-300 जागा मिळतील असा अंदाज आहे. ब्रोकरेज फर्मने 21 स्टॉक सुचवले आहेत, ज्यामुळे पुढच्या वर्षभरात गुंतवणूकदार श्रीमंत होऊ शकतो.

भाजपाला किती जागा मिळतील?

फिलिप कॅपिटलनुसार, “भाजपाला 299-300 तर एनडीएला 330 ते 340 जागा मिळू शकतात. हे आकडे खरे ठरले, तर पॉलिसी कन्टिन्यूटि लक्षात घेऊन इक्विटी, इन्कम आणि अर्थव्यवस्थेत दीर्घकालाच्या दृष्टीने सकारात्मकता राहील” ब्रोकरेज फर्म ऑटोमेशन, ईवी, डिफेंस, रेल्वे, लॉजिस्टिक्स, बंदर, रस्ते, रिअल इस्टेट, मेटल्स, सीमेंट, एनर्जी आणि फायनान्शिअल सेक्टरबाबत पॉझिटिव्ह आहे.

फिलिप कॅपिटलचा 1 वर्षासाठी कुठले स्टॉक घेण्याचा सल्ला

एसबीआय, बीओबी, कॅनरा बँक, पीएफसी, आरईसी, श्रीराम फायनान्स, मुथूट फायनान्स, अल्ट्राटेक, सीमेंस, हीरो मोटोकॉर्प, टीवीएस मोटर, डिवीज़ लॅब्स, सिंजेन, एपीएल अपोलो, जिंदल एसएडब्ल्यू, आईजीएल, आरती इंडस्ट्रीज, विनती ऑर्गेनिक्स, प्राज, गोकलदास एक्सपोर्ट आणि एसपी अप्रॅल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.