BSNL : Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी आपलं BSNL ही मैदानात..या कंपनीची घेणार मदत..

BSNL : डेटा पुरविण्यात बीएसएनएल ही मागे राहणार नाही..या सरकारी कंपनीने त्यासाठी कंबर कसली आहे..

BSNL : Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी आपलं BSNL ही मैदानात..या कंपनीची घेणार मदत..
BSNL ची सेवा लवकरचImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 5:06 PM

नवी दिल्ली : सरकारी कंपनी भारत दूरसंचार निगम लिमिटेड (BSNL) ग्राहकांना डाटा (Data) पुरविण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. तांत्रिक सहकार्यासाठी कंपनीने भागीदारीही शोधला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेल कंपनीसमोर स्वस्तात प्लॅन देण्याचे आव्हान उभं ठाकू शकते.

ग्राहकांना 4G सेवा मिळावी यासाठी बीएसएनएल टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) ची मदत घेणार आहे. 4G नेटवर्क सुरु करण्यासाठी BSNL ला केंद्र सरकारने 26,821 कोटी रुपयांचा करार करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे परिणाम बाजारात दिसून येतील.

या मंजुरीमुळे आता देशभरात बीएसएनएलची 4G सेवा कार्यान्वीत होईल. टीसीएस त्यासाठी बीएसएनएलला मदत करणार आहे. करारानुसार, पुढील 9 वर्षांपर्यंत टीसीएस 4G नेटवर्कसाठी सेवा पुरवेल. त्याआधारे बीएसएनएल जिओसहीत इतर कंपन्यांना टफ फाईट देईल.

हे सुद्धा वाचा

हा करार प्रत्यक्षात येत आहे. BSNL लवकरच TCS ला करारापोटी 10 हजार कोटी रुपयांची ऑर्डर देणार आहे. याविषयीची घोषणा लवकरच होऊ शकते. या दोघांमधील नवीन 4G करार हा 1.64 लाख कोटी रुपयांच्या बेलआउट पॅकेजचाच एक भाग आहे.

या करारानुसार केंद्र सरकार बीएसएनएलला स्पेक्ट्रमचे अनुदान, 4G लॉन्च आणि ऑपरेशनसाठी निधी आणि भांडवली खर्च देणार आहे. या करारामुळे भारत अमेरिका, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि इतर प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल.

हा करार होताच, पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे. बीएसएनलच्या 111 दशलक्ष ग्राहकांना त्याचा थेट फायदा होईल. त्यांच्या नवीन अद्ययावत हँडसेटवर 4 जी सेवेचा त्यांना लाभ घेता येणार आहे. साधारणतः डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान ही सेवा सुरु करण्याचा मानस आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.