घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, अर्थसंकल्पात काय महाग, काय स्वस्त?
सेक्शन 80C अंतर्गत गृहकर्जाच्या मूळ रकमेवर दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. सोबतच सेक्शन 24 अंतर्गत पहिल्या आर्थिक वर्षात व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभही मिळत होता. हा लाभ आता 3.5 लाख रुपये करण्यात आलाय.
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, ग्रामीण भारतासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मध्यमवर्गीयांना दिलासा देत घर खरेदीसाठी गृहकर्जावर मिळणारी सवलत 2 लाखांहून 3.5 लाखांवर नेली आहे. ही सूट 45 लाख रुपयांपर्यंतचं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळेल. सेक्शन 80C अंतर्गत गृहकर्जाच्या मूळ रकमेवर दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. सोबतच सेक्शन 24 अंतर्गत पहिल्या आर्थिक वर्षात व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभही मिळत होता. हा लाभ आता 3.5 लाख रुपये करण्यात आलाय.
करातील सवलती व्यतिरिक्त पंतप्रधान आवास योजनेंतर्गत खर खरेदीवर अनुदानही दिलं जातं. या योजनेंतर्गत व्याजावर 2.6 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जातं. ही अनुदान योजना आणखी काही काळासाठी वाढवण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकाला स्वतःचं घर असावं यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळेच विविध सवलती देण्यात आल्या आहेत.
पेट्रोल-डिझेल आणि सोनं महागणार
पेट्रोल आणि डिझेल वाढवण्यात आलं आहे. एक रुपयांनी किंमत वाढणार आहे. तर सोने आणि इतर धातूंवरही 10 ते 12.5 टक्क्यांपर्यंत एक्साईज ड्युटी वाढवण्यात आली आहे. मेक इन इंडिया म्हणजे भारतात तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातून येणाऱ्या जवळपास प्रत्येक वस्तूची किंमत वाढणार आहे.
या वस्तू महाग होणार
परदेशातून येणारं तेल
प्लास्टिक, रबर
पेपर छपाई
पुस्तकांची कव्हर आणि छपाई
ऑप्टिकल फायबरसाठी वापरले जाणारे वॉटर ब्लॉकिंग टेप्स
टाईल्सच्या वस्तू (सिरेमिक उत्पादने)
स्टेनलेस स्टील
मिश्र धातूचं वायर
एसी
रस्ते बांधकामासाठीचं क्रशर मशिन
लाऊडस्पीकर
डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर
सीसीटीव्ही आणि आयपी कॅमेरा
ऑप्टिकल फायबर बंडल
ऑटोमोबाईल साहित्य
इलेक्ट्रॉनिक वस्तू, सॉकेट, प्लग्स
सोने
सिगारेट, तंबाखू
धुम्रपानाच्या सर्व वस्तू
चुईंगम
या वस्तू स्वस्त होणार
टेक्सटाईल वस्तू
केमिकल्स
वाहनातील चार्जर
कम्प्रेसर
युरेनियम
नाविन्यकरण ऊर्जेसाठी आवश्यक गोष्टी
फोम
लष्करी साहित्य