Petrol & Diesel: पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा

पेट्रोलवर 2.5 रुपयांचा तर डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस लागणार आहे. त्यामुळे शंभरीनजीक येऊन ठेपलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. | Petrol and Diesel

Petrol & Diesel: पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 1:46 PM

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel price) वाढत्या दरांमुळे चिंतेत असलेल्या सामान्यांना मोदी सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी मोदी सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार (Cess tax) लावण्याची घोषणा केली. (Agriculture cess on petrol and diesel will increase prices for further)

त्यानुसार पेट्रोलवर 2.5 रुपयांचा तर डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस लागणार आहे. त्यामुळे शंभरीनजीक येऊन ठेपलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी आणि स्पेशल एक्साईज ड्युटी दे दोन कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर वाढीव सेसचा काही परिणाम होणार नाही, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता केंद्राच्या या निर्णयावर विरोधक आक्रमक होणार का, हे पाहावे लागेल.

LIC च्या प्रशासकीय नियमांत बदल करण्यासाठी विधेयक

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्याच्या घडीला LIC कडे तब्बल 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बाजारपेठेत IPO आणण्यासाठी केंद्र सरकारला LIC च्या प्रशासकीय नियमांत काही बदल करावे लागतील. त्यानंतरच केंद्र सरकारला एलआयसीमधील हिस्सेदारी विकता येईल. त्यामुळे आता केंद्र सरकार यासाठी संसदेत सुधारणा विधेयक मांडणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.

जाणून घ्या काय स्वस्त?, काय महाग?

काय स्वस्त?

पोलाद- कस्टम ड्युटीत सूट मिळणार

तांबे- तांब्यावरील कस्टम ड्युटीत सूट

टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार

केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार

सोने-चांदी – कस्टम ड्युटी पुन्हा कमी करणार

चामड्याच्या वस्तू, गारमेंट- कस्टम ड्युटी कमी करणार

काय महाग?

अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल-इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर

ऑटो पार्ट- काही गोष्टीवर कस्टम ड्युटी वाढवली

जेम्स स्टोन- कस्टम ड्युटी वाढवली

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार

मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

(Agriculture cess on petrol and diesel will increase prices for further)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.