Budget 2021 : अर्थमंत्र्यांकडून ‘सरकारी सेल’ची घोषणा, वाचा काय काय विकणार सरकार?
यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने आणखी काही सरकारी कंपन्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत निर्गुंतवणूक करुन 2 लाख कोटी रुपये उभे करण्याची घोषणा करण्यात आलीय.
नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने आणखी काही सरकारी कंपन्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत निर्गुंतवणूक करुन 2 लाख कोटी रुपये उभे करण्याची घोषणा करण्यात आलीय. सरकार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अनेक सरकारी कंपन्या विकून या कंपन्यांमधील आपलं भांडवलं मिळवण्यासाठी निर्गुंतवणुकीकर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह (BPCL) यात अनेक कंपन्यांचा समावेश आहे (Budget 2021 List of government companies which will be sale to collect revenue by Modi Government).
निर्मला सीतारमण म्हणाल्या, “पुढील आर्थिक वर्षात BPCL, एअर इंडिया, कॉनकोर आणि SCI मधील भांडवलाचं निर्गुंतवणुकीकरण करण्यात येईल. याशिवाय भारतीय विमा कंपनीचा (LIC) आयपीओ आणण्याचं पुढील वर्षी नियोजन आहे. IDBI मधील भांडवलाचं देखील निर्गुंतवणुकीकरण करण्यात येईल. तसेच शेअर बाजारातील उसळी पाहता केंद्र सरकार लवकरच काही CPSE मध्ये देखील भागिदारी देखील ऑफर फॉर सेलच्या (OFS) माध्यमातून विकेल. इतर खासगीकरणाचे व्यवहार देखील आर्थिक वर्ष 2022 पर्यंत पूर्ण केले जातील.”
In 2021-22 we would also bring the IPO of LIC for which I am bringing the requisite amendments in this session itself: Finance Minister Nirmala Sitharaman #UnionBudget pic.twitter.com/NifUTtlCku
— ANI (@ANI) February 1, 2021
आर्थिक तूट कमी करण्यासाठी सरकारनं बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय
आर्थिक तूट कमी करण्यासाठी सरकारनं बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीच आयडीबीआय बँकेसह दोन बँकांना मोदी सरकार विकणार आहे. कोरोनामुळे महसूल घटलेला असून, खर्चसुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यांनाही खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्रीय कोषातून एक प्रोत्साहनपूरक पॅकेज आणणार आहोत, असंही सांगितलंय.
एलआयसीचा आयपीओ येणार
एलआयसीचा लवकरच आयपीओ येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केलीय. त्यामुळे एलआयसीचा आयपीओ पहिल्या सहामाहीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारनं मूल्यांकनासाठी एका कंपनीचीही नेमणूक केली असून, शेअर बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Budget 2021-22 : तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Policy चा परिणाम काय?
Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा
व्हिडीओ पाहा :
Budget 2021 List of government companies which will be sale to collect revenue by Modi Government