Budget 2024 LIVE Stream | असा रंगणार अर्थसोहळा; कुठे आणि कसे पाहता येणार बजेट भाषण?

Budget 2024 LIVE Stream Today उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तर 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थमहोत्सव साजरा होणार आहे. देशाची आर्थिक नाडी चाचपल्यानंतर केंद्र सरकार देशाचे आर्थिक आरोग्य कसे आहे, याचा लेखाजोखा संसदेसह देशासमोर मांडेल. तुम्हाला कुठे पाहता येणार हे बजेट?

Budget 2024 LIVE Stream | असा रंगणार अर्थसोहळा; कुठे आणि कसे पाहता येणार बजेट भाषण?
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 11:05 AM

नवी दिल्ली | 30 January 2024 : देशाची वित्तंबातमी 1 फेब्रुवारी 2024 रोजी तुम्हाला जाणून घेता येईल. देशाचा अर्थमहोत्सव साजरा होणार आहे. देशाचे आर्थिक आरोग्य कसे आहे, ते तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या उपाय योजना करण्यात येणार आहे. देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना काळानंतर देशातील डिजिटल बजेटची सुरुवात झाली. पेपरलेस बजेटची प्रथा सुरु झाली आहे. हे बजेट तुम्हाला कुठे पाहता येईल? जाणून घ्या इत्यंभूत माहिती..

संसदीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

बजेट सेशनची सुरुवात 31 जानेवारीपासून होईल. बजेट सेशनचे पहिले सत्र 9 फेब्रुवारीपर्यंत चालेल. बजेट सेशनच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेला उद्देशून भाषण करतील. बजेट सत्राची सुरुवात होईल. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्व्हे सादर होईल. आर्थिक सर्व्हे संक्षिप्त असेल.

हे सुद्धा वाचा

11 वाजता सादर होईल बजेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता लोकसभेत केंद्रीय बजेट 2024 सादर करतील. 1999 पासून केंद्रीय अर्थसंकल्प दुपारी 11 वाजता सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे. यापूर्वी ते संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येत होते. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर केले होते. तेव्हापासू अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे.

मोबाईल ऐपवर उपलब्ध

संसदेत केंद्रीय बजेटचे भाषण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे भाषण आणि दस्तावेज केंद्रीय बजट मोबाईल एपवर उपलब्ध होईल. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत, अँड्राईड आणि आईओएस या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर ते उपलब्ध करुन देण्यात येईल. तुम्ही हे एप www.indiabudget.gov.in येथून डाऊनलोड करु शकता.

येथे Budget Live

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण तुम्हाला लाईव्ह बघता येईल. संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच पत्र सूचना कार्यालय(PIB) बजेट 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करेल.
  2. टीव्ही9 मराठीसह इतर वृत्त वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. युट्यूबवरही तुम्हाला बजेट 2024 चे लाईव्ह प्रक्षेपण बघता येईल. विविध सरकारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, फेसबूक, ट्विटर आणि युट्यूबवर बजेटचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
  3. तुम्ही Union Budget Mobile App वर अर्थसंकल्पा पाहू शकता. हे एप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. या दोन्ही भाषेत बजेटसंबंधीचा सर्व तपशील तुम्हाला पाहता येईल.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.