Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | बजेटच्या काही तास अगोदरच अपडेट गॅस सिलेंडरच दाम; खिशावर किती येणार ताण

Budget 2024 | देशाचे अंतरिम बजेट थोड्याच वेळात सादर होणार आहे. त्यापूर्वीची तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल केला आहे. आता तुमच्या शहरात काय आहे गॅस सिलेंडरचा भाव जाणून घ्या. तुमच्या खिशाला आता किती बसेल झळ, जाणून घ्या लवकर..

Budget 2024 | बजेटच्या काही तास अगोदरच अपडेट गॅस सिलेंडरच दाम; खिशावर किती येणार ताण
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 10:48 AM

नवी दिल्ली | 1 February 2024 : अंतरिम अर्थसंकल्प आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशातील चार महानगरासह इतर ठिकाणी तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या भावात बदल केला आहे. देशातील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल झाला आहे. तर घरगुती गॅसच्या आघाडीवर केंद्र सरकारने ग्राहकांचा रोष काही ओढावून घेतला नाही. सलग सहाव्यांदा घरगुती गॅसच्या किंमती स्थिर आहेत. त्यात काहीच बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 30 ऑगस्ट रोजी वाढला होता. त्यानंतर त्यात बदल झालेला नाही. आता बजेटपूर्वी  देशातील चार महानगरांमध्ये काय आहेत गॅस सिलेंडरचा भाव जाणून घ्या…

कमर्शियल गॅस सिलेंडरच्या भावात वाढ

कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत मामूली वाढ दिसून आली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 14 रुपये तर कोलकत्तामध्ये भाव 18 रुपयांनी वाढले. तर मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. 15 रुपयांनी किंमतीत वाढ झाली. चेन्नईत 12.50 रुपयांनी किंमती वाढल्या. या चार महानगरात क्रमशः 1769.50 रुपये, 1887 रुपये, 1723.50 रुपये आणि 1937 रुपये असे भाव झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

घरगुती गॅसची किंमती तरी किती

घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात कोणताही बदल दिसला नाही. सलग सहाव्यांदा घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल दिसून आला नाही. आकड्यांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये भाव आहे. तर मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 918.50 रुपये आहे. चेन्नईत हा भाव 918.50 रुपये आहे. 30 ऑगस्ट 2023 रोजीनंतर किंमतीत वाढ झालेला नाही. तर 29 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपये कपात केली होती.

गेल्या महिन्यात तात्पूरता दिलासा

गेल्या 1 जानेवारी 2024 रोजी 19 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत मामूली दिलासा मिळाला होता. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली होती. ही अगदी किरकोळ कपात ठरली होती. दिल्ली पासून ते चेन्नईपर्यंत कर्मशियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 1.50 ते 4.50 रुपयांची स्वस्ताई आली होती. या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 1755.50 रुपये तर मुंबईत सिलेंडरची किंमत 1708 रुपये झाली होती.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.