Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | खुल जा सिम सिम; सर्वसामान्यांना काय गिफ्ट देणार मोदी सरकार

Budget 2024 | आता थोड्याच वेळात, केंद्राचं बजेट सादर होईल. केंद्रीय अर्थमंत्री त्यांच्या पेटाऱ्यात सर्वसामान्यांसाठी काय गिफ्ट देतात. काय घोषणा करतात, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अंतरिम बजेट आहे. आता अवघ्या काही वेळातच बजेट सादर होईल.

Budget 2024 | खुल जा सिम सिम; सर्वसामान्यांना काय गिफ्ट देणार मोदी सरकार
आता थोड्याच वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल.
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 10:49 AM

नवी दिल्ली | 1 February 2024 : भारताचे केंद्रीय बजेट आज सादर होत आहे. थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम बजेट सादर करतील. हे त्यांचे सहावे बजेट आहे. हे अंतरिम बजेट असले तरी सीतारमण यांच्या पेटाऱ्यात काही तरी खास असेल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी या बजेटमध्ये मोठी घोषणा होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मोदी सरकारच्या 2.0 मधील या शेवटच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता काही वेळातच अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल.

11 वाजता सादर होईल अर्थसंकल्प

हे सुद्धा वाचा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज  11 वाजता लोकसभेत केंद्रीय बजेट 2024 सादर करतील. 1999 पासून केंद्रीय अर्थसंकल्प दुपारी 11 वाजता सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे. यापूर्वी ते संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येत होते. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर केले होते. तेव्हापासून अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे.

येथे पाहा Budget Live

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण तुम्हाला लाईव्ह बघता येईल. संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच पत्र सूचना कार्यालय(PIB) बजेट 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करेल.

टीव्ही9 मराठीसह इतर वृत्त वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. युट्यूबवरही तुम्हाला बजेट 2024 चे लाईव्ह प्रक्षेपण बघता येईल. विविध सरकारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, फेसबूक, ट्विटर आणि युट्यूबवर बजेटचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मोबाईल ऐपवर उपलब्ध

संसदेत केंद्रीय बजेटचे भाषण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे भाषण आणि दस्तावेज केंद्रीय बजट मोबाईल एपवर उपलब्ध होईल. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत, अँड्राईड आणि आईओएस या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर ते उपलब्ध करुन देण्यात येईल. तुम्ही हे एप www.indiabudget.gov.in येथून डाऊनलोड करु शकता.

GYAN वर लक्ष

केंद्र सरकार या बजेटमध्ये गरीब, युवा, किसान आणि महिला GYAN वर फोकस करणार आहे. या चार जाती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यात महिलांची लोकसंख्या अर्धी आहे. महिला वर्गाला भाजपकडे वळविण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून अधिक लक्ष देत आहे. त्यामुळेच या चार वर्गासाठी बजेटमध्ये खास घोषणा होऊ शकते.

आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.