Budget 2024 | बजेटपूर्वीच का करतात हलवा सोहळा? खरंच सर्वसामान्यांना मिळतो का ‘गोडवा’

Budget 2024 | अर्थसंकल्पापूर्वी हलवा सोहळा साजरा करण्याची पद्धत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. पण एकदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच हा सोहळा रद्द केला होता. त्या आता 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम बजेट सादर करतील.

Budget 2024 | बजेटपूर्वीच का करतात हलवा सोहळा? खरंच सर्वसामान्यांना मिळतो का 'गोडवा'
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 9:25 AM

नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : यंदा 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. केंद्रीय अर्थमंत्री या अंतरिम बजेट सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहे. दरवर्षी बजेट सादर होण्यापूर्वी हलवा सोहळा (Halwa Ceremony) साजरा केला जातो. कोरोना काळात हलवा सोहळ्याला ब्रेक लागला होता. यंदा हलवा सोहळा साजरा होईल. महागाई आणि कर्जावरील वाढत्या व्याजदराने नागरिक त्रस्त आहेत. त्यांना या बजेटमध्ये मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे. हलवा सोहळा दिल्लीत होईल. तर अर्थसंकल्पातून हा गोडवा सर्वसामान्यांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कर्मचारी असतात क्वारंटाईन

  1. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यातील कोणतीची माहिती बाहेर पडू न देण्याची काळजी घेतली जाते. त्यासाठी बड्या अधिकाऱ्यांसह, सचिव आणि इतर कर्मचारी अर्थ मंत्रालयाच्या परिसरात डेरे दाखल असतात. त्यांची सर्व व्यवस्था तिचे करण्यात येते. ते या परिसराच्या बाहेर पडत नाहीत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केल्यानंतर त्यांची या ठिकाणाहून सूटका होते.
  2. जोपर्यंत बजेट सादर होत नाही. तोपर्यंत कर्मचारी याच परिसरात राहतात. या ठिकाणी त्यांच्या निवासाची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात येते. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या नार्थ ब्लॉक परिसरात 10 दिवस, जवळपास 100 कर्मचारी या परिसरात राहतात.
  3. हे सुद्धा वाचा
  4. भारतीय संस्कृती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन करतात. बजेटचे अवघड कार्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने सहज पूर्ण होते. त्यामुळे तोंड गोड करुन हा सोहळा साजरा करण्यात येतो. त्यासाठी हलवा सोहळा खास असतो. दहा दिवसांच्या श्रमाचे चीज आनंद साजरा करुन केले जाते. हलव्याने तोंड गोड केले जाते.
  5. बजेटची तयारी पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी हलवा सोहळा करण्यात येतो. बजेट तयार झाल्याचा हा एकप्रकारे संकेत असतो. या सोहळ्यात अर्थ मंत्रालयातील मोठे अधिकारी, मंत्री सहभागी होतात. हा एकप्रकारे गेट टू गेदरचा कार्यक्रम असतो.

सोहळा करण्यात आला होता रद्द

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एकदा हलवा सेरेमनी रद्द केली होती. 2022 मध्ये अर्थसंकल्पापूर्वी हलवा सोहळा झाला नाही. देशात कोरोनाचे रुग्ण वाढले आणि कोरोनाची साथ पसरली, त्यामुळे त्यांनी हा सोहळा रद्द केला. त्यांनी त्यावेळी अधिकाऱ्यांना मिठाई दिली. आता बजेटमध्ये प्रत्येक वेळी सर्वसामान्यांना दिलासा मिळतोच असे नाही. कभी खूशी, कभी गम असा अनुभव दरवर्षी येतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.