Richest Man : एकाच दिवसात कमावले 3 लाख कोटी! कोण आहे हा उद्योगपती
Richest Man : या उद्योगपतीने एकाच दिवसात 3 लाख कोटी रुपयांची कमाई केली. हा उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, बिर्ला यांच्या पंक्तीतील नाही, पण त्याच्या एका दिवसाच्या कमाईने तो एकदम चर्चेत आला आहे. कोण आहे हा उद्योगपती
नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : या उद्योगपतीच्या एका दिवसाच्या कमाईने सर्व रेकॉर्ड (Record Of Income) तोडले आहे. त्याने एकाच दिवसात 3 लाख कोटी रुपयांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीने जगातील अनेकांना धक्का बसला आहे. बरं हा उद्योगपती काही अमेरिका, रशिया, युरोप, जपान, दक्षिण कोरीया, चीन वा भारतातील नाही. पण त्याने ही अविश्वसनीय कामगिरी केली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) वा गौतम अदानी, रतन टाटा, बिर्ला यांच्या पण तो पंक्तीतील नाही. पण त्याच्या एक दिवसाच्या कमाईने तो एकदम प्रकाश झोतात आला आहे. त्याच्याविषयी जाणून घेण्याची सर्वांचीच उत्सुकता ताणल्या गेली. हा उद्योजक कोण आहे, तो कोणत्या देशाचा आहे, याविषयी चर्चा रंगली आहे.
फाम न्हात वुओंग
हे नाव वाचताच तुमच्या लक्षात आले असेल की हा पूर्वेतील एखाद्या देशातील उद्योजक असेल. तर फाम न्हात वुओंग (Billionaire Pham Nhat Vuong) हे व्हिएतनाम (Vietnam) या देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. त्यांनी एकाच दिवसात 39 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 3 लाख कोटी कमाई करण्याचा रेकॉर्ड केला आहे.
कोणती आहे कंपनी
फाम न्हात वुओंग हे विनफास्ट ओटोचे (VinFast Auto) मालक आहे. इलेक्ट्रिक वाहनं निर्मितीत ही कंपनी आहे. ही कंपनी 2017 साली त्यांनी सुरु केली. फाम न्हात वुओंग हे व्हिएतनामचे पहिले अब्जाधीश आहेत. त्यांच्या कंपनीने वाहन विक्रीत मोठी आघाडी घेतली आहे. व्हिएतनामची अर्थव्यवस्था पण झपाट्याने बदलत आहे.
आणखी एक विक्रम नावावर
विनफास्ट ऑटोने पण एक मोठा विक्रम नोंदवला आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल सर्वाधिक आहे. जनरल मोटर्स कंपनी आणि मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी यांना पण कंपनीने मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी 255 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे फाम न्हाट वुओंगची संपत्ती 44.3 अब्ज अमेरिकन डॉलर झाली.
कंपनीवर वर्चस्व
फाम न्हाट वुओंग यांचे या समूहावर वर्चस्व आहे. कंपनीच्या आऊटस्टँडिंग 99 टक्के शेअरवर त्यांचे नियंत्रण आहे. Ving Group JSC या माध्यमातून त्यांचे या कंपनीत भागभांडवल आहे. विनफास्ट ऑटोची स्थापना त्यांनी 2017 मध्ये केली होती. या कंपनीच्या या वर्षातील विक्रीचा आकडा 45,000 ते 50,000 दरम्यान असण्याचा अंदाज आहे. उत्तर कॅरोलिना येथे त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्याचे काम सुरु केले आहे. जुलै 2023 पासून हे काम सुरु झाले आहे. या कंपनीत वुओंग आणि त्यांच्या नातेवाईकांनी 249,24,105,000 इतक्या रुपयांची गुंतवणूक केली आहे.
व्हिएतनामचे पहिले अब्जाधीश
फाम न्हाट वुओंग यांचा जन्म 5 ऑगस्ट 1968 रोजी झाला. ते व्हिएतनाम देशाचे पहिले अब्जाधीश आहेत. त्यांच्या वडिलांनी व्हिएतनाम लष्करात सेवा बजावली. तर त्यांच्या आईचे चहाचे दुकान होते. हनोईमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी किम लिईन हायस्कूलमधून 1985 मध्ये पदवीचे शिक्षण घेतले.