AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला ‘हा’ बिझनेस

अनेकांनी व्यवसाय म्हणून शेतीचा (Farming) पर्याय निवडला आहे. ज्यामध्ये आधुनिकतेचा वापर करून आपण चांगला पैसा कमावू शकतो.

फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला 'हा' बिझनेस
कोणाला मिळणार योजनेचा लाभ – सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी फक्त महिलाच अप्लाय करू शकतात. यामध्ये अर्जदाराचं वय किमान 18 वर्षे असणं महत्त्वाचं आहे.
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 12:48 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या काळानंतर आर्थिक मंदी असताना नोकरी मिळणं आणि व्यवसाय करणं मोठं कठीण होऊन बसलं आहे. अशात देशात असे अनेक सुशिक्षित तरुण आहेत ज्यांची नाळ अद्यापही आपल्या मातीशी जोडली आहे. अनेकांनी व्यवसाय म्हणून शेतीचा (Farming) पर्याय निवडला आहे. ज्यामध्ये आधुनिकतेचा वापर करून आपण चांगला पैसा कमावू शकतो. आम्हीही तुम्हाला असाच एक व्यवयासायाचा उत्तम पर्याय देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमी पैशात जास्त कमाई करू शकता. (business idea start button mushroom farming and earns up to rs 3 lakhs per year)

या व्यवसाय म्हणजे एक्झॉटिक वेजिटेबल बटण मशरूम (Button Mushroom). रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठी मशरूमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हल्ली युट्यूबमधून याची शेती करण्याची टेकनिक शिकून अनेक तरुण हा व्यवसायात उतरले आहेत.

बटण मशरूम ही एक अशी प्रजाती आहे ज्यामध्ये भरपूर खनिजं (Minerals) आणि जीवनसत्त्वं (Vitamins) आहेत. या फायद्यांमुळे मशरूमची मागणी वाढत आहे. बाजारात त्याची किरकोळ किंमत 300 ते 350 रुपये प्रति किलो आहे आणि घाऊक दर यापेक्षा 40 टक्के कमी आहे. मशरुमची मागणी वाढत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेती सोडून मशरूमची शेती करण्यास सुरुवात केली आहे.

50 हजारांवर कमावले 2.50 लाख रुपये

बटण मशरूमच्या लागवडीसाठी कंपोस्ट तयार करण्याची आवश्यकता आहे. एक क्विंटल कंपोस्ट 1.5 किलो बियाणे घेतं. 4 ते 5 क्विंटल कंपोस्ट बनवल्यानंतर सुमारे 2 हजार किलो मशरूम पिकवता येईल. आता जर 2 हजार किलो मशरूम किमान किलो 150 रुपये विकली गेली तर तुम्हाला जवळपास 3 लाख रुपये मिळतील. म्हणजे तुम्ही जर 50 हजार रुपयांचा खर्च केला तरी 2.50 लाख रुपये तुमचे असतील.

कमी जागेत सुरू करा मशरूमची शेती

प्रति चौरस मीटरमध्ये तुम्ही 10 किलो मशरूम आरामात उगवू शकता. कमीतकमी 40×30 फूट जागेत तीन ते तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम शेती करू शकता. (business idea start button mushroom farming and earns up to rs 3 lakhs per year)

संबंधित बातम्या –

Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा व्यवसाय, महिन्याला भरभरून कमवाल

नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये

घर बसल्या परदेशात सुरू करा व्यवसाय, ‘या’ गोष्टी केल्या तर बक्कळ पैसा कमवाल

Special Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल

(business idea start button mushroom farming and earns up to rs 3 lakhs per year)

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.