Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा व्यवसाय, महिन्याला भरभरून कमवाल
तुम्हालाही कमी पैशात व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडीया घेऊन आलो आहोत.
मुंबई : पैसे कमवायचे म्हटले तर नोकरी आणि व्यवसाय असे दोनच पर्याय आहेत. अशात अनेकांना नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यात जास्त रस असतो. व्यवसाय म्हटलं की कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळण्याची चांगली संधी असते. तुम्हालाही कमी पैशात व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडीया घेऊन आलो आहोत. यामध्ये कमी भांडवलीमध्ये तुम्ही चांगला बिझनेस करू शकता. (business idea start t shirts printing business with only 50 thousand and earn up to rs 40000 every month)
कोणता आहे व्यवसाय ?
हा व्यवसाय आहे टीशर्ट प्रिंटिंगचा. अगदी 50 हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये दर महिन्याला तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. सध्या बाजारात प्रिंट केलेल्या टी-शर्टला मोठी मागणी आहे. यामध्ये छोट्या प्रमाणात तुम्ही टी-शर्ट प्रिटिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. सध्या प्रिंटेड टी-शर्ट देण्याचाही ट्रेंड सुरू आहे. मुलांच्या वाढदिवसाला तर याची मोठी मागणी असते.
प्रिंटेड टी-शर्ट व्यवसायात किती गुंतवणूक कराल?
प्रिंटेड टी-शर्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला 50 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर सहजपणे महिन्याला 30 हजार ते 40 हजार रुपयांची कमाई करू शकता. यासाठी सोशल मीडिया आणि ई-कॉमर्सचाही तुम्हाला वापर करता येईल. याने कमाई वाढवण्याची चांगली संधी आहे.
काय आहे खर्च आणि कमाईचं गणित?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिंटेड टीशर्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एका प्रिंटिंग मशीनची आवश्यकता आहे. 50 हजार रुपयांपर्यंत ही प्रिंटिंग मशीन येते. यानंतर, कच्चा माल म्हणून तुम्ही साधी पांढऱ्या रंगाची टी-शर्ट 120 रुपयांच्या किमतींवर प्रिंट करू शकता. यानंतर तुम्ही हळूहळू टीशर्ट 250 ते 300 रुपयांमध्ये सहज विकू शकता. यानेच तुम्हाला नफा आणखी वाढवता येईल.
कसे कमावला हजारो रुपये?
प्रिंटेड टी-शर्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन प्रकारच्या मशीन लागतात. एक मॅन्युअल मशीन असते आणि दुसरे पूर्णपणे स्वयंचलित असते. जर तुम्ही सुरुवातीला मॅन्युअल ब्रशने व्यवसाय सुरू केला, तरीही यातून चांगली कमाई होऊ शकते. यामध्ये तुम्ही 1 मिनिटात 1 टी-शर्ट प्रिंट करू शकता. मग विचार करा जर तुम्ही दररोज 10 ते 15 टी-शर्ट प्रिंट केले तर त्याची संख्या एका महिन्यात 300 ते 450 टी-शर्टमध्ये वाढेल.
आता प्रत्येक टी-शर्टवर जर तुम्ही 100 रुपये पैसे घेतले तरी सहज 30,000 ते 45000 रुपयांपर्यंत तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. यामध्येही जर तुम्हाला आणखी नफा हवा असेल तर तुम्ही स्वयंचलित मशीन घेऊन हे काम मोठ्या प्रमाणात करू शकता. (business idea start t shirts printing business with only 50 thousand and earn up to rs 40000 every month)
संबंधित बातम्या –
महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवा आणि मिळवा बक्कळ पैसा, खास आहे पोस्टाची योजना
ICICI Bank कडून ग्राहकांना अलर्ट, लवकर अपडेट करा मोबाईल अॅप नाहीतर…
Post Office Scheme: अवघ्या 5 वर्षात मिळणार 21 लाख, 100 रुपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक
(business idea start t shirts printing business with only 50 thousand and earn up to rs 40000 every month)