Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारापेक्षा स्वस्तात खरेदी करा सोने! सोमवारपासून सुरु होत आहे सेल

Gold Bond | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा (Sovereign Gold Bond Scheme) 2015 मध्ये श्रीगणेशा केला. आता योजनेची तिसरी योजना सुरु होत आहे. ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आली आहे. या योजनेत ग्राहकांना 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या भावाने सोने खरेदी करता येईल.

बाजारापेक्षा स्वस्तात खरेदी करा सोने! सोमवारपासून सुरु होत आहे सेल
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 4:46 PM

नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : सोन्यातील गुंतवणूक पण फायदेशीर ठरते. सोन्याची दागिने तयार करुन घरात ठेवण्यापेक्षा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही योजना तुम्हाला मालामाल करु शकते. मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा (Sovereign Gold Bond Scheme) 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेचा 8 वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. त्यात ग्राहकांना जोरदार परतावा मिळाला आहे. केंद्र सरकार सोमवारी सोन्यात गुंतवणूक करण्याची खास संधी देत आहे. या योजनेत ग्राहकांना 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या भावाने सोन्यात गुंतवणूक करता येईल. या गुंतवणुकीवर जीएसटी वा कर लागत नाही. या योजनेत वार्षिक व्याज पण मिळते.

सोमवारपासून सुवर्णसंधी

सोमवारपासून सॅव्हरिन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणुकीची संधी मिळेल. भारतीय रिझर्व्ह बँक 18 डिसेंबरपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची तिसरी मालिका सुरु करत आहे. त्याचे प्रति ग्रॅम दरपत्रक पण आले आहे. तर योजनेत डिजिटल पेमेंटद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

62,000 पेक्षा कमी भाव

देशातील अनेक सराफा बाजारात सोन्याचा भाव सध्या 64,000 रुपयांच्या जवळपास आहे. पण आरबीआयने ग्राहकांसाठी या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 6,199 रुपये प्रति ग्रॅमचा भाव ठेवला आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्यासाठी 62,000 रुपये मोजावे लागतील. डिजिटल पेमेंट केले तर गुंतवणूकदारांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळेल. सोन्याचा भाव 6,149 रुपये प्रति ग्रॅम असेल. आरबीआयचा गोल्ड बाँड हा 24 कॅरेट सोन्याच्या किंमती इतका असतो.

1 लाखावर 8 वर्षांत1.28 लाख कमाई

नोव्हेंबर 2015 मध्ये गोल्ड बाँडमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांना या 30 नोव्हेंबर रोजी जवळपास 2.28 लाख रुपयांचा परतावा मिळाला. 8 वर्षांत त्याला जवळपास 1.28 लाख रुपयांचा नफा झाला. विशेष म्हणजे ग्राहकाला सोने खरेदी करण्याचे वा ते सांभाळण्याची चिंता या योजनेत नाही. या मालिकेतील गोल्ड बाँडवर सप्टेंबर 2016 नंतर व्याजदर घटले आहे. ग्राहकाला पूर्वी 2.75 टक्क्यांनी व्याज मिळत होते. आता 2.5 टक्के दराने व्याज मिळाले. या योजनेने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्...
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्....
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं.
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'.
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं.
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार.
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह.
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?.
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी.