Sovereign Gold Bond : एकदम स्वस्तात खरेदी करा शंभर नंबरी सोने ! सरकारची हमी, घरबसल्या गुंतवणुकीची संधी
Sovereign Gold Bond : एकदम स्वस्तात सोने खरेदी करण्याची आजची शेवटची संधी आहे. केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत स्वस्तात सोने खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 6 मार्च पासून ही संधी उपलब्ध होती. घरबसल्या तुम्ही ही खरेदी करु शकता.
नवी दिल्ली : सोन्यात गुंतवणुकीचा विचार पक्का झाला असेल तर सराफा बाजारापेक्षा स्वस्तात सोने खरेदी करता येईल. ते पण कोणत्याच दुकानात न जाता. घरबसल्या तुम्हाला सोने खरेदी करता येईल. या सोन्याला केंद्र सरकारची हमी पण आहे. त्यामुळे आता मागे हटता कशाला? चांगला परतावा देणाऱ्या या योजनेत गुंतवणूक करा. 6 मार्च 2023 रोजीपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत (SGB) गुंतवणुकीची संधी होती. या गोल्ड बाँडसाठी एक ग्रॅम सोन्याचा भाव 5,611 रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ही किंमत जाहीर केली आहे. 2022-23 मधील ही सॉव्हरिन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond scheme 2022-23 -Series-IV) ही चौथी मालिका होती.
सार्वभौम सुवर्णरोखे योजनेतंर्गत 6 ते 10 मार्च या दरम्यान सुवर्णरोख्यात गुंतवणूक करता येणार होती. आज शेवटचा दिवस आहे. सोन्याचा भाव 5,611 रुपये प्रति ग्रॅम आहे. सेंट्रल बँकेने एक अधिकृत निवेदन दिले आहे. त्यानुसार, ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसमध्ये 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना गोल्ड बाँडची इश्यू प्राईस एका ग्रॅमसाठी 5,561 रुपये असेल.
सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्या सवलत मिळते.
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.
या ठिकाणी करता येईल खरेदी
- सुवर्ण बाँड सर्व बँकांमधून, त्यांच्या संकेतस्थळावरुन खरेदी करता येईल
- स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) मध्ये सुविधा
- जवळचे पोस्ट कार्यालय, तसेच पेमेंट बँका, त्यांचे ॲप, ऑनलाईन साईट यावरुन
- स्मॉल फायनान्स बँक, त्यांचे ॲप, संकेतस्थळ यावर घरबसल्या या योजनेत गुंतवणूक करता येईल