Gold Silver Price Update : सोन्यात स्वस्ताईचा धमाका! आज होणार खरेदीदारांची चांदी

Gold Silver Price Update : सोन्या-चांदीच्या भावात प्रत्येक दिवशी चढउतार होत आहे. या आठवड्यात तर सोन्यावर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे.

Gold Silver Price Update : सोन्यात स्वस्ताईचा धमाका! आज होणार खरेदीदारांची चांदी
स्वस्ताई
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 10:09 AM

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत (Gold Price) सातत्याने घसरण होत आहे. या आठवड्यात सोन्याने मोठी उसळी घेतलेली नाही. होळी, रंगोत्सव, महिला दिन अशा धामधुमीच्या काळात ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदीचा आनंद लुटता आला आहे. सोन्यात गेल्या आठवड्यात चढउतार दिसून आला. पण या आठवड्यात सोन्याने रिव्हर्स गिअर टाकल्याने खरेदीदारांचा आनंद गगनात मावला नाही. त्यांनी खरेदीवर मोठी बचत केली. चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. पण चांदीने पुन्हा उसळी घेतल्याने चांदी खरेदीदार थोडे खट्टू झाले. पण तज्ज्ञांच्या मते, चांदीतील (Silver Price) ही तेजी पुन्हा कमी होईल. खरेदीदारांची लवकरच चांदी होईल. त्यांना मोठा फायदा होईल.

गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही (Silver Price) लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव घसरला. सध्या खरेदीदारांसाठी सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे तर स्वस्त चांदीमुळे पण अनेकांची चांदी होत आहे.

गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव काल 51,150 रुपये होता. आज या भावात काहीच बदल झालेला नाही. आजही कालच्याच भावात, स्वस्तात सोने खरेदीची संधी ग्राहकांना चालून आली आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमतही वाढलेली नाही. या किंमतीत कसलाही बदल झालेला नाही. त्यामुळे सराफा बाजारात कालच्याच भावात सोने खरेदीची संधी ग्राहकांना मिळाली आहे. चांदीच्या किंमतीत किलोमागे 100 रुपयांची घसरण झाली. आज भाव 65,450 रुपये प्रति किलो आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या पंधरवाड्यात 28 फेब्रुवारी रोजी शुद्ध सोन्याचा भाव 56,270 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51600 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, 22 कॅरेटच्या भावात 450 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 490 रुपयांनी किंमती घसरल्या आहेत. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,620 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,320 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,630 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,630 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,030 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 55,660 रुपये आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.