Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foxconn Investment : या राज्यावर फॉक्सकॉनचा फोकस! गुंतवणूक वाढवली चार पट

Foxconn Investment : तैवानची सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादनातील मोठी कंपनी फॉक्सकॉनने आता या राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला गॅसवर ठेवत या राज्यात चार पट गुंतवणूक वाढवण्यात आली आहे.

Foxconn Investment : या राज्यावर फॉक्सकॉनचा फोकस! गुंतवणूक वाढवली चार पट
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 7:24 PM

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : एप्पलचा सर्वात मोठी पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन (Foxconn Company) काही दिवसांपासून भारतात चर्चेत आहे. सेमीकंडक्टर आणि चिप (Semiconductor and Chips) उत्पादनात ही कंपनी सर्वात अग्रेसर आहे. तैवानची ही कंपनी भारतात तिचे मॅन्यूफॅक्चरिंग हब तयार करु इच्छित आहे. त्यासाठी कंपनीने उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या वेदांतासोबत हातमिळवणी केली होती. पण हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच गुंडाळण्यात आला. त्यामुळे आता पुढे काय होणार असे वाटत होते. अगोदर महाराष्ट्र आणि नंतर गुजरातला गॅसवर ठेवते फॉक्सकॉनने या राज्यावर फोकस केला आहे. या राज्यात कंपनीने गुंतवणूक थोडी थोडकी नाही तर चार पट वाढवली आहे. त्यामुळे या राज्यात रोजगार तर वाढणारच आहे. पण महसूल ही वाढणार आहे.

Apple चा साथीदार

तैवानची ही कंपनी करारावर मालाचा पुरवठा करते. कंपनी एप्पलसाठी आयफोनच नाही तर इतर पण अनेक उत्पादन करते. सध्या ही कंपनी एप्पलची सर्वात मोठी पुरवठादार आहे. देशात फॉक्सकॉन इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात संधी शोधत आहे. काही दिवसांतच कंपनीची ईव्ही बाजारात येण्याची शक्यता आहे. भारतात कंपनी सेमीकंडक्टर प्रकल्प पण सुरु करणार आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या गुंतवणुकीचे होते लक्ष्य

फॉक्सकॉन इंडियाचे प्रतिनिधी वी ली यांनी सोशल मीडियावर त्यांच्या गुंतवणूकीचे चित्र समोर ठेवले. त्यानुसार कंपनी आता तेलंगाणातील उत्पादन प्रकल्पावर फोकस करत आहे. कंपनी त्यासाठी 400 दशलक्ष डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक करेल. यापूर्वी फॉक्सकॉनने तेलंगाणा प्रकल्पासाठी 150 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. आता गुंतवणूक वाढवल्याने ही गुंतवणूक 550 दशलक्ष डॉलर होईल. सुरुवातीच्या गुंतवणुकीपेक्षा ही जवळपास चार पट आहे.

तामिळनाडूमध्ये प्रकल्प

फॉक्सकॉनने दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये पण गुंतवणूक केली आहे. FII कम्युनिकेशन्स, मोबाइल नेटवर्क आणि क्लाउड कम्प्युटिंग इक्विपमेंट्सची निर्मिती करते. त्यासाठी ती तामिळनाडूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. याविषयी राज्य सरकारसोबत चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. त्यानुसार कंपनी 180-200 दशलक्ष गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात, 2024 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा फॉक्सकॉनचा आग्रह आहे.

कर्नाटकमध्ये पण एंट्री

वेदांताशी फिस्कटल्यानंतर फॉक्सकॉन गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरु करणार का याविषयी सांशकता आहे. दक्षिणेतील राज्य कर्नाटकात पण एक कंपनी सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी 1.07 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.  तर कंपनीने दक्षिणेतील राज्यांकडे मोर्चा वळविल्याचे या गुंतवणुकीवरुन दिसून येते.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.