AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Campa Cola : आता कॅम्पाचा स्वाद परदेशात पण! काय आहे रिलायन्सची योजना

Campa Cola : कॅम्पा कोला खरेदी केल्यानंतर आता त्याच्या विस्ताराची योजना तयार करण्यात आली आहे. केवळ भारतातच नाही तर शीतपेयाचा बाजार परदेशात पण वाढविण्यात येत आहे. आता भारताचे कोल्ड्रिंक्स परदेशातील व्यक्ती चाखणार आहे.

Campa Cola : आता कॅम्पाचा स्वाद परदेशात पण! काय आहे रिलायन्सची योजना
| Updated on: Aug 29, 2023 | 5:57 PM
Share

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : आता इतिहास बदलणार आहे. आतापर्यंत परदेशातील कोल्ड्रिंक्स ब्रँड भारतात येऊन विक्री होत होते. या कंपन्यांनी ब्रँडिंग आणि जाहिरातीच्या बळावर देशातील बाजारपेठ काबीज केली. पण आता भारतीय कोल्ड्रिंक्सचा ब्रँड (Cold Drinks Brand) परदेशात विक्री होणार आहे. रिलायन्सने त्यासाठी कंबर कसली आहे. रिलायन्सने काही दिवसांपूर्वीच कॅम्पा कोला हा जूना ब्रँड खरेदी केला होता. या ब्रँडने पुन्हा बाजारात मांड ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीची विस्तार योजना आखण्यात आली आहे. पण केवळ भारतातच नाही तर परदेशात पण कंपनी विस्तार करणार आहे. परदेशात कम्पा कोला विक्री होणार आहे. आफ्रिका आणि आशिया खंडातील काही देशांमध्ये या शीतपेयाची विक्री करण्यात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) यांनी कम्पा कोला (Campa Cola) बाहेर विक्रीचा निर्णय घेतला आहे. परदेशात या विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात जागतिक स्तरावर हा ब्रँड विक्री करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

काय आहे योजना

सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत ईशा अंबानी यांनी कॅम्पाच्या पुढील योजनेची, घडामोडीची माहिती दिली. भारतात या शीतपेयाला चांगला प्रतिसाद मिळाला. लाँचिंग होताच, ग्राहकांनी बाजारात कॅम्पाला भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे RIL च्या पॅकेज्ड कंझ्युमर गुड्स ब्रँड आणि रिलायन्स रिटेल व्हेचर्सचे मालक असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने कॅम्पा कोलासाठी महत्वकांक्षी योजना तयार केली आहे.

22 कोटी रुपयांत खरेदी केला ब्रँड

मुकेश अंबानी यांच्यारिलायन्स कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेडने 50 वर्षांपूर्वीच्या कोल्ड ड्रिंक ब्रँड रिलाँच केला. कँम्पा हे नाव जुन्या पिढीच्या ओठांवर आजही आहे आणि त्याची चव ही अनेकांना आठवत असेल . प्युअर ड्रिंक्स समूहाकडून (Pure Drinks Group) रिलायन्सने 22 कोटी रुपयांत हा ब्रँड खरेदी केला आहे. सध्या कँम्पा तीन फ्लेवरमध्ये येत आहे. त्यात कँम्पा कोला, कँम्पा लेमन आणि कँम्पा ऑरेंज यांचा समावेश आहे.

2001 मध्ये प्लँट बंद

90 च्या दशकात नरसिंहराव यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी अनेक वित्त सुधारणा केल्या. डंकल करार आणि इतर अनेक गोष्टी घडल्या. भारताने रशियाच्या पाऊलावर पाऊल टाकत, उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचा नारा दिला. त्यात जगातील मोठे ब्रँडस देशात आले. सलमान खान याने कँम्पा कोलाची पहिली जाहिरात केली होती. त्यांच्या रणनीतीपुढे कँम्पा तग धरु शकला नाही. 2001 साली कँम्पाने त्यांचे दिल्लीत कार्यालय, बॉटलिंग प्लँट बंद केला.

सीलोनसोबत करार

वृत्तानुसार, Campa Cola बॉटलिंग क्षमता वाढवणार आहे. यापूर्वी आलेल्या वृत्तानुसार, Reliance Consumer Product ने मुथया मुरलीधरनच्या सीलोन बेव्हरेज इंटरनॅशनल (Ceylon Beverage International) सोबत करार केला. त्यानुसार कॅम्पा कोला केनमध्ये पण उपलब्ध होणार आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.