Visit To Vietnam : काय सांगताय, केवळ 26 रुपयांत परदेश वारी! या एअरलाईंसची अविश्वसनीय धूमधडाका ऑफर

Unbelievable Fare News : अहो दहा किलोमीटरसाठी आपल्याकडे रिक्षाला 26 रुपये मोजावे लागतात. इथं तर थेट परदेशात जाण्याची संधी मिळत आहे, काय आहे ही ऑफर?

Visit To Vietnam : काय सांगताय, केवळ 26 रुपयांत परदेश वारी! या एअरलाईंसची अविश्वसनीय धूमधडाका ऑफर
AirplaneImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 12:04 PM

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती(Petrol-Diesel) पाहता देशात दहा किलोमीटर जायचे असेल तर रिक्षावाले 26 रुपये भाडे आकारतील. पण इथं तर अवघ्या 26 रुपयांमध्ये तुम्हाला चक्क विदेश वारीची (Foreign Trip) संधी मिळत आहे. आता हा काय प्रकार असे तुम्हाला वाटतं असेल तर, व्हिएतनाम (Vietnam) या देशाच्या विमानवाहतूक (Air transport) कंपनीने ही धूमधडाका ऑफर (Offer) आणली आहे. अर्थात त्याच्यामागे चलन मूल्याचे गणित आहे. जर डॉलरपुढे रुपया कमकुवत आहे, तसेच व्हिएतनामी चलन (Currency) रुपयापुढे कमजोर आहे. त्याचा फायदा तुम्हाला या देशात घेता येतो. निसर्गाने नटलेल्या या देशात पर्यटन उद्योग जोमदार आहे. तुम्हाला या देशाचे आदरतिथ्य तर अनुभवता येईलच पण खिश्याला हा फारशी झळ बसणार नाही. अग्नेय आशियातील या छोट्या देशाला खास भेट देण्याची ही संधी तुम्ही चुकवू नाही अशीच आहे. अवघ्या 26 रुपयांमध्ये या देशात तुम्हाला लँड होता येईल आणि इथली निसर्गसंपदा आणि प्रेक्षणीय स्थळं पाहता येतील. तेही अगदी स्वस्तात. त्यामुळे ही संधी चुकवू नये अशीच आहे.

हे सुद्धा वाचा

26 रुपयात पोहचा व्हिएतनाममध्ये

ही शानदार, जानदार, धमाकेदार ऑफर VietJet या विमानसेवा कंपनीने आणली आहे. कंपनीने केवळ 9,000 व्हिएतनामी डोंग (VND) मध्ये म्हमजे केवळ 26 रुपयात ही ऑफर आणल्याची बातमी मिंटने दिली आहे. भारतीय चलनाच्या बदल्यात व्हिएतनामी डोंगचे मूल्य अत्यंत कमी आहे. त्यामुळे 9,000 व्हिएतनामी डोंगचे भारतीय मूल्य 25 ते 30 रुपये एवढेच असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या विमानसेवा कंपनीने ही ऑफर सध्या सर्व घरगुती आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागू केली आहे. VietJet ने 777,777 उड्डाणांच्या तिकीटांवर ही सवलत सुरु केली आहे. 7 जुलै ते 13 जुलै 2022 या कालावधीत सर्व देशांतर्गत उड्डाणे तसेच व्हिएतनाममध्ये निघणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय मार्गांवर बुकिंगसाठी ऑफर वैध असेल. पुढील वर्षी 26 मार्च 2023 रोजी पासून तुम्ही या देशात प्रवासाला सुरुवात करु शकता.भारतीय प्रवाशांसाठी ही विशेष डील सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. भारतीय प्रवाशी नवी दिल्ली आणि मुंबई ते हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि फु क्वोक तिकिटे बुक करू शकतात.

नवीन उड्डाणांची घोषणा

VietJetने अलीकडेच नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगळूरुसाठी व्हिएतनाममधील प्रसिद्ध शहर डा नांगला जोडणा-या पाच नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे जाहीर केले आहेत.

सध्या चार उड्डाणे

सध्या, व्हिएतजेट व्हिएतनाम आणि भारत दरम्यान चार उड्डाण सेवा चालवते, ज्यात नवी दिल्ली/मुंबई – हनोई आणि नवी दिल्ली/मुंबई – हो ची मिन्ह सिटी यांचा समावेश आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.