AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्टन कूलचा ‘ड्रोन’ शॉट; IPO पूर्वी या कंपनीत 4 कोटी ओतले, गुंतवणुकीच्या पिचवर माहीची पुन्हा दमदार बॅटिंग

M S Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. पण त्याने यावेळी ड्रोन शॉट मारला आहे. त्याने या कंपनीचा आयपीओ येण्यापूर्वीच 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी पण अनेक स्टार्टअप्समध्ये कॅप्टन कूलने गुंतवणूक केलेली आहे.

कॅप्टन कूलचा 'ड्रोन' शॉट; IPO पूर्वी या कंपनीत 4 कोटी ओतले, गुंतवणुकीच्या पिचवर माहीची पुन्हा दमदार बॅटिंग
एम एस धोनीची जोरदार गुंतवणूक
| Updated on: Oct 06, 2024 | 5:31 PM
Share

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता कॅप्टन कूलने गुंतवणुकीच्या पिचवर पण दमदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे. त्याने आयपीओ येण्यापूर्वीच या कंपनीत 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी पण त्याने अनेक बड्या स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. क्रिकेटरसोबतच त्याच्याकडे व्यावसायिक गुण असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. ड्रोन तयार करणारी कंपनी गरुड़ एअरोस्पेसमध्ये (Garuda Aerospace) त्याने गुंतवणूक केली आहे. ही कंपनी लवकरच बाजारात IPO आणण्याची तयारी करत आहे.

4 कोटींची गुंतवणूक

कॅप्टन कूल धोनीने गरुड एअरोस्पेसमध्ये किती रक्कम गुंतवणूक केली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम 4 कोटी रुपये इतकी आहे. या गुंतवणुकीनंतर धोनीची या कंपनीतील गुंतवणूक आता 1.1 टक्के इतकी झाली आहे. यापूर्वी पण धोनीने अनेक स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक त्याच्या फायद्याची ठरली आहे.

धोनीच्या पाठबळामुळे उत्साह दुणावला

गरूड कंपनीच्या या प्रवासात सहभागी झाल्याचा आनंद असल्याचे धोनी म्हणाला. ही कंपनी जागतिक स्तरावर वेगाने पुढे जात आहे. कृषी, संरक्षण, औद्योगिक आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी ड्रोन तयार करण्याचा प्रयत्न कंपनी करत असल्याचे माही म्हणाला. गरुड़ एअरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश यांनी धोनीच्या पाठबळामुळे उत्साह दुणावल्याचे सांगितले. यामुळे आता आम्ही कंपनीला नवी दिशा आणि भरारी देऊ असे ते म्हणाले. गरुड आता आकाशी आणि दुर्गम भागातही सक्षमपणे पोहचत असल्याचे ते म्हणाले.

कंपनीचा बाजारात 50 टक्के वाटा

गरुड एअरोस्पेस कंपनीला ड्रोन निर्मिती आणि प्रशिक्षणासाठी DGCA कडून मान्यता मिळाली आहे, असं प्रमाणपत्र मिळवणारी ती एकमेव कंपनी ठरली आहे. ड्रोन बाजारात कंपनीचा 50 टक्के वाटा आहे. कृषी आणि सर्वसामान्य ग्राहक क्षेत्रात कंपनीने जोरदार आगेकूच केली आहे. आता कंपनी जगभरात पंख पसरत आहे. कंपनीमध्ये 200 हून अधिक कर्मचारी आहे. कंपनीत 30 विविध प्रकारचे ड्रोन तयार करते आणि 50 वेगवेगळ्या सेवा देते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.