Tax Refund : 1 कोटी 79 लाख कोटी करदात्यांना 1 लाख 62 हजार कोटींचा रिफंड, सीबीडीटीची घोषणा
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन यांच्याकडून 1 लाख 79 कोटीहून अधिक करदात्यांना 1 लाख 62 हजार 448 कोटी रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) यांच्याकडून 1 लाख 79 कोटीहून अधिक करदात्यांना 1 लाख 62 हजार 448 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. 1 एप्रिल 2021 ते 24 जानेवारी 2022 दरम्यानच्या कालावधीत ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. 57 हजार 54 कोटी रुपये 1 कोटी 77 लाख 35 हजार 899 प्रकरणांमध्ये ही रक्क्म वर्ग करण्यात आली आहे. कॉर्पोरेट टॅक्स रिफंड (Corporate Tax Refund) 1 लाख 04 हजार 694 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. एकूण 2 लाख 23 हजार 952 प्रकरणांमध्ये ही रक्क्म वर्ग करण्यात आली आहे. ज्या करदात्यांनी आयकर परतावा फाईल केला असेल. म्हणजेच उत्पन्नावर जितका कर लागणार आहे त्यापेक्षा जादा रक्कम आयकर विभागाकडे जमा केली असल्यास ती रक्कम परत करदात्यांना रिफंडच्या माध्यमातून देण्यात येते.
एएनआयचं ट्विट
CBDT issues refunds of over Rs 1,62,448 Cr to more than 1.79 Cr taxpayers from 1st Apr 2021 to 24th Jan 2022. Income tax refunds of Rs 57,754 Cr have been issued in 1,77,35,899 cases: Central Board of Direct Taxation
— ANI (@ANI) January 27, 2022
इन्कम टॅक्स रिफंड किती देण्यात आला?
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनच्या वतीनं आयकर परतावा म्हणून 57 हजार 754 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 1 लाख 77 हजार 899 प्रकरणांमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. सीबीडीटीनं ही रक्कम ट्रानस्फर केल्याची माहिती एनएनआयनं ट्विट द्वारे दिली आहे.
कॉर्पोरेट टॅक्स म्हणून किती परवाता?
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन कॉर्पोरेट टॅक्स रिफंड 1 लाख 04 हजार 694 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. एकूण 2 लाख 23 हजार 952 प्रकरणांमध्ये ही रक्क्म वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
रिफंड संदर्भातील माहिती कुठं मिळणार ?
आयकर विभागाने पाठवलेल्या परताव्याच्या रकमेची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग वेबसाईटला भेट द्यावी लागते. येथे लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर आपण येथे आयकर परतावा स्थिती तपासू शकता.
इतर बातम्या:
भारताचे महान हॉकीपटू, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाचे कॅप्टन चरणजीत सिंग यांचे निधन
CBDT issues refunds of over Rs 162448 Cr to र्more than 1 crore 79 lakh taxpayers