IRCTC कडून 1,75,000 रुपये जिंकण्याची संधी, फक्त एक मिनिटाचा व्हिडीओ बनवा
हे एक लाख रुपये मिळविण्यासाठी आपल्याला फक्त एक व्हिडीओ बनवावा लागणार आहे. आयआरसीटीसी Vlogers साठी एक विशेष स्पर्धा घेऊन आलीय, ज्याद्वारे आपल्याला हे बक्षीस मिळेल.
नवी दिल्ली: जर तुम्हालाही प्रवासाची आवड असेल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आयआरसीटीसी फिरण्याची आवड असलेल्या लोकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देत आहे. हे एक लाख रुपये मिळविण्यासाठी आपल्याला फक्त एक व्हिडीओ बनवावा लागणार आहे. आयआरसीटीसी Vlogers साठी एक विशेष स्पर्धा घेऊन आलीय, ज्याद्वारे आपल्याला हे बक्षीस मिळेल.
या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट
या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. आयआरसीटीसी ही स्पर्धा CoRover च्या सहकार्याने आयोजित करीत आहे. आयआरसीटीसीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिलीय. आयआरसीटीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी Vlogers ना भारतीय रेल्वे आणि तिकीट, कॅटरिंग, पर्यटन, हवाई, चॅटबॉट आणि पर्यटन स्थळांसारख्या अनेक विषयांवर व्हिडीओ बनवावे लागतील.
अर्ज कसा करावा?
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी, https://corover.ai/vlog/ या लिंकवर जाऊन स्पर्धक फॉर्म भरू शकतात.
किती रुपयांचे बक्षीस कोणाला मिळणार?
या स्पर्धेत प्रथम विजयी झालेल्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचे बक्षीस तसेच प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देखील देण्यात येणार आहे. दुसर्या क्रमांकाच्या स्पर्धकास 50000 रुपयांचे प्रमाणपत्र व ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 25000 रुपयांचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व विजेत्यांना भेट कार्ड आणि 500 रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाईल.
300 विजेत्यांची घोषणा केली जाणार
या स्पर्धेअंतर्गत सुमारे 300 विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. सर्व राज्यातील लोक यात सहभागी होऊ शकतात. व्हिडीओची गुणवत्ता आणि सामग्री पाहिल्यानंतर विजेता घोषित केला जाईल.
आयआरसीटीसीकडे कॉपीराईट असेल
IRCTC CoRover च्या सहकार्याने ते आयआरसीटीसी आणि महाराजा व्हिडीओंवर अपलोड करावे लागतील. यासह एकदा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्याचे आयआरसीटीसीद्वारे कॉपीराइट केले जातील. त्यामध्ये बनवणाऱ्याचे नाव दिले जाईल. त्याच वेळी बनवणारा या व्हिडीओसाठी हक्क सांगू शकत नाही.
#vlogger or #content #creators please watch what @shekharsuman7 has to say to Participate in #IRCTC & #CoRover vlogging contest by creating & uploading a video/vlog to stand a chance to win #exciting prizes. For more details https://t.co/fA6pPNR6wm https://t.co/jnUTPBh9Uy
— IRCTC (@IRCTCofficial) July 24, 2021
या विषयांवर व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात
आयआरसीटीसी टूरिझम, आयआरसीटीसी एअर, आयआरसीटीसी आयमुद्रा अॅप आणि वेबसाईट, आयआरसीटीसी ई-कॅटेरिंग, आयआरसीटीसी एसबीआय कार्ड, आयआरसीटीसी नवीन ई-तिकीट वेबसाईट, आयआरसीटीसी बस बुकिंग, आयआरसीटीसी तेजस ट्रेन, सेवानिवृत्त खोली बुकिंग यांसारख्या विषयांवर आयआरसीटीसी टूरिझम पाठवले जाऊ शकतात.
संबंधित बातम्या
LPG cylinder Booking: ‘या’ अॅपसह गॅस सिलिंडर बुक करा, बंपर कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या फायदा
chance to win Rs 1,75,000 from IRCTC, just make a one minute video