Chandrayaan-3 मुळे एका कंपनीच नशीब पालटलं, काही दिवसातच कमावले 40,195 कोटी रुपये

Chandrayaan-3 नंतर एका कंपनीच नशीब पालटलं आहे. चांद्रयान-3 नंतर सातत्याने कंपनीच्या शेअर मुल्यात वाढ झाली आहे. Chandrayaan-3 मुळे नशीब पालटलेली ती कंपनी कुठली? शेअरमध्ये 25 दिवसात 12 टक्के वाढ झालीय.

Chandrayaan-3 मुळे एका कंपनीच नशीब पालटलं, काही दिवसातच कमावले 40,195 कोटी रुपये
Chandrayaan-3
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 2:09 PM

मुंबई : चांद्रयान-3 च्या यशात योगदान देणाऱ्या कंपन्यांच नशीब चांगलच फळफळलं आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ झाली आहे. पण एका कंपनीला चांद्रयान-3 मिशनमुळे खूपच फायदा झाला आहे. दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीची खूपच प्रगती झालीय. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं होतं. 18 ऑगस्टनंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 12 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ दिसून आलीय. या कंपनीच नाव आहे, लार्सन टुब्रो. कंपनीच मार्केट कॅप 4 लाख कोटी रुपयांच्या पार गेलं आहे. तीन आठवड्यात लार्सन टुब्रोचा शेअर कुठून कुठे पोहोचलयाय जाणून घ्या. कंपनीच्या गुंतवणूकदारांना किती फायदा झालाय.

लार्सन एंड टुब्रोच्या शेअरमध्ये 25 दिवसात 12 टक्के वाढ झालीय. 18 ऑगस्टपासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये भरभरुन वाढ झालीय. 18 ऑगस्टला कंपनीचा शेअर 2,639.90 रुपये होता. आता त्याच शेअरची किंमत 2926 रुपये आहे. म्हणजे 25 दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये 286 रुपयापेक्षा जास्त वाढ दिसून आलीय. चांद्रयान-3 नंतर सातत्याने कंपनीच्या शेअर मुल्यात वाढ झाली आहे. आता बातमी आहे की, जगातील सर्वात मोठी ऑईल कंपनी सौदी अरामकोने 4 बिलियन डॉलरपेक्षा मोठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर मुल्याच वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स

लार्सन एंड टुब्रोच्या शेअर्समध्ये वाढ झालीय. याचा परिणाम कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. 18 ऑगस्टनंतर कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 40 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 18 ऑगस्टला मार्केट बंद होण्याआधी कंनपीची मार्केट कॅप 3,70,892.49 कोटी रुपये होतं. आता ते 4 लाख कोटीच्या पुढे गेलं आहे. आता कंपनीच्या शेअर्सच मुल्य 2926 रुपये आहे. कंपनीची मार्केट कॅप 4,11,088.08 रुपये आहे. गुंतवणूकदारांना सुद्धा चांगले रिटर्न्स मिळत आहेत. आज कंपनीच्या शेअरमध्ये थोडी वाढ पहायला मिळाली आहे. सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी कंपनीच्या शेअरमध्ये 12.75 वाढ दिसून आली. 2914.75 रुपयांवर व्यवसाय करत होता. शुक्रवारी कंपनीचा शेअर 2902 रुपयांवर बंद झाला होता.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.