Chandrayaan-3 मोहिमेमुळे बंपर कमाई! 3000 कोटींचा लागला जॅकपॉट
Chandrayaan-3 | चंद्रयान-3 मोहिमेने भारताने इतिहास घडवला. चंद्रमाच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. या चंद्रयान मोहिमने यशाच्या अनेक गाथा आणि कथा रचल्या आहेत. या मोहिमेतील अनेक कंपन्यांना बंपर नफा झाला आहे. त्यांची अजूनही कमाई होत आहे. या कंपनीने गेल्या तिमाहीत जोरदार महसूल मिळवला.
नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : तर यावर्षीतील ऑगस्ट महिना हा इस्त्रोसाठी ऐतिहासिक ठरला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जागतिक विक्रम नावावर नोंदवला. चंद्रयान-3 मोहिमचं नाही तर त्यानंतर आदित्य एल1 या मोहिमेने तर इस्त्रोच्या अंतराळ सफरीवर चार चांद लावले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्रयान मोहिमेने अनेक यशोगाथा लिहिल्या. त्यात अजून भर पडतच आहे. इस्त्रोच्या या मोठ्या मोहिमांध्ये अनेक कंपन्यांनी हातभार लावला. त्याची अमृतफळ या कंपन्यांना नफ्याच्या रुपाने चाखता येत आहेत. या मोहिमेतील या कंपनीने नफ्यात आणि महसूलात नवीन विक्रम रचला आहे.
लार्सन अँड टूब्रो झाली मालामाल
चंद्रयान-3 मोहिमेत लार्सन अँड टूब्रो कंपनी मालामाल झाली. या कंपनीचा या मोहिमेत मोठा वाटा होता. एअरोस्पेस युनिटच्या चंद्रयान-3 लाँच व्हेईकलसाठी कंपोनेंट्सचा पुरवठा केला होता. रॉकेटसाठी Booster Segment या कंपनीनेच तयार केले होते. यामध्ये हेड अँड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल बकेटफ्लेज यांचा समावेश आहे. चंद्रयान मोहिमेपूर्वीच या प्रयोगातील सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार उसळी दिसून आली. लार्सून अँड टूब्रो ही कंपनी पण तेजीच्या लाटेवर स्वार झाली. या कंपनीच्या नफ्यात 45 टक्क्यांहून अधिक उसळी आली.
दुसऱ्या तिमाहीत जोरदार निकाल
लार्सन अँड टूब्रो कंपनीने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा केली. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 44.6 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचा नफा 3,222.63 कोटी रुपयांवर पोहचला. एका वर्षात या कंपनीच्या नफ्यात जोरदार उसळी आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत एलअँडटीचा नफा 2,2228.97 कोटी रुपयांवर पोहचला होता. यंदाच्या पहिल्या तिमाहीत पण कंपनीच्या नफ्यात तेजी दिसून आली. हा नफा 2,493 कोटी रुपये होता.
तिमाही निकालांचा शेअरवर परिणाम
ऑगस्ट महिन्यात चंद्रयान-3 मिशन लाँच करण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी आली. चंद्रावर भारताने इतिहास रचला. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिले नाही. हा शेअर सूसाट धावला. गेल्या दोन आठवड्यात बाजारातील घसरणीचा मोठा परिणाम या स्टॉकवर दिसून आला. गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 22 टक्के रिटर्न दिला आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.