Petrol Diesel Price Today : राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल रायगडमध्ये, तुमच्या शहरातील भाव माहिती आहे का?
Petrol Diesel Price Today : राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल रायगडमध्ये मिळत आहे. तर राज्यातील चार शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला आहे. यामध्ये तुमचे तर शहर नाही ना
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचा (Crude Oil Price) अहिस्ता कदम, कदमताल सुरु आहे. कधी किंमतीत वाढ तर कधी घसरण, अशा दोलनामय स्थिती किंमती आहेत. पंधरा दिवसांपूर्वी कच्चा तेलाने किंमतीत मोठी उसळी घेतली. त्यानंतर किंमतींना टेकू मिळत नसल्याने या इंधनाने उसळी मारली नाही. त्यामुळे सर्वच देशांनी उसासा टाकला आहे. भारतीय तेल कंपन्यांना मार्चच्या तिमाहीत फायदा झाला. मे महिन्यात आता ओपेक संघटनेच्या धोरणाचा काय परिणाम होतो, ते दिसून येईल. सध्या रशिया आणि इराककडून भारताला स्वस्तात इंधन पुरवठा होत आहे. तेल उत्पादन घटविण्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) काय आहे, ते जाणून घेऊयात
या ठिकाणी महागडे इंधन आज सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी भाव जाहीर केले आहे. त्यानुसार, राज्यात जालना पेट्रोल 108.05 रुपये तर डिझेल 94.53 रुपये लिटर आहे. परभणी पेट्रोल 108.76 रुपये तर डिझेल 95.20 रुपये लिटर आहे. नांदेड पेट्रोल 108.32 रुपये तर डिझेल 94.78 रुपये लिटर आहे. यवतमाळ पेट्रोल 108.17 रुपये तर डिझेल 94.65 रुपये लिटर आहे आणि रत्नागिरीत पेट्रोल 108.01 आणि डिझेल 94.49 आज सर्वात महागडे आहे. तर रायगडमध्ये पेट्रोल 105.77 आणि डिझेल 92.28 हा भाव आहे.
कच्चा तेल वधारले आज 25 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत फार मोठा उलटफेर झाला नाही. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 77.39 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 81 डॉलर प्रति बॅरलवर होते.
असा बसेल फटका
- ओपेक आणि रशियाचा कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय
- 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल
- सौदी अरब प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करणार
- इराक प्रति दिवस 211,000 बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन घटविणार
- संयुक्त अरब अमिरात 144,000 बॅरल प्रति दिवस कपात करणार
- कुवेत 128,000 बॅरल तर अल्गेरिया 48 हजार बॅरलचे उत्पादन घटविणार
- ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली
भाव एका SMS वर
- भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
- देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
- त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
- पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
- इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
- इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
- बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
- त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
- त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
- एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.