AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China Economy : लाल तारा झाकोळला! चीनच्या अर्थव्यवस्थेला का लागले ‘ग्रहण’

China Economy : चीनच्या लाल भिंतीला सध्या तडे गेले आहेत. हा डोलारा केव्हा, कधी आणि कसा कोसळेल हे चीनच्या कम्युनिस्टांना, निष्ठावंतांनाच माहिती. हा मोठा लाला तारा साम्यवाद्यांच्या नकाशावरुन निखळणार तर नाही ना, अशा स्थितीत हा देश येऊन ठेपला आहे. यामागील कारणं तरी काय?

China Economy : लाल तारा झाकोळला! चीनच्या अर्थव्यवस्थेला का लागले 'ग्रहण'
| Updated on: Aug 24, 2023 | 3:51 PM
Share

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : साम्यवादाच्या नकाशावरील मोठा लाल तारा म्हणजे, आपला शेजारी चीन (China). या देशाने साम्यवाद्याच्या जोरावर अवघ्या काही दशकात उत्तुंग झेप घेतली. जागतिक अर्थव्यवस्था, सत्ता केंद्र त्याच्याकडे वळविण्यात तो हिकमतीने यशस्वी ठरला. चीन ग्लोबल ग्रोथ इंजिन आहे. चीन म्हणजे जगाची फॅक्टरी आहे. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांनी या देशात कधीच्याच राहुट्या टाकल्या आहेत. आक्रमकता, विजिगिषु वृत्ती, एकहाती सत्ता, केंद्रीय निर्णय क्षमता, धाकटपेशा स्वभाव यामुळे चीन अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालू लागला. वन रोड वव बेल्ट, कर्ज देऊन चीनने अनेक देशांना अंकित केले. पण अचानक जगातील या मोठ्या अर्थव्यवस्थेला (Why China Economy is Collapsing) कोण घरघर लागली. हा मोठा लाला तारा साम्यवाद्यांच्या नकाशावरुन निखळणार तर नाही ना, अशा स्थितीत हा येऊन ठेपला. काय आहे यामागील कारणं ?

सर्वात मोठी घसरण

चीनला जगाचा कारखाना म्हणतात. जगातील अशी एकही उत्पादन नाही, जे या फॅक्टरीत होत नसेल. पण चीनची अर्थव्यवस्था अचानक सुस्तावली. गेल्या काही आठवड्यांपासून त्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. चीनच्या अधिपत्याखालील हाँगकाँगचा हँगसँग इंडेक्स गेल्या शुक्रवारी जोरदार आपटला. जानेवारीच्या उच्चांकापेक्षा तो 20 टक्के घसरला. गेल्या काही आठवड्यात चीनचे चलन युआन 16 वर्षांच्या निच्चांकावर पोहचला.

नोकऱ्या नाही

कोव्हिड लॉकडाऊननंतर चीनमध्ये व्यावसायिक वृद्धी जोरदार आहे. पण अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होताना दिसत नाही. वृद्धी दर जणू काही थबकला आहे. बाजारात वस्तूंच्या किंमती घसरल्या आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात तर मोठा फटका बसला आहे. बेरोजगारांच्या फौजा नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. देशातील प्रमुख गृह विकासक कंपन्या, संस्थांकडे गुंतवणुकीसाठी पैसाच नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे चीनची आर्थिक नाडी सुन्न झाल्याचे मानण्यात येत आहे.

रेटिंग संस्थांनी घटवला अंदाज

चीनचा आर्थिक विकासाचा दर 5% पेक्षा कमी असेल, असा अंदाज रेटिंग संस्थांनी वर्तवला आहे. जीडीपीचा वृद्धी दर खूपच खाली खेचला जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. रिअल इस्टेट क्षेत्र बुडाले तर चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युबीएस अनालिस्टस, नोमुरा, मॉर्गन स्टेनली आणि बार्कलेज या सारख्या जागतिक संस्थांनी त्यांचे पूर्वीचे वृद्धीदराचा अंदाज घटवला आहे.

प्रॉपर्टी मार्केटमध्ये मंदी

चीनमधील अनेक मोठे विकासक कंपन्या, संस्था यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. तर रिअल इस्टेटमध्ये घर खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या विकासकांकडे पैशांची चणचण भासत आहे. प्रापर्टी डेव्हलपर्सने देशातील बँका, वित्तीय संस्थांचे 2.9 ट्रिलियन डॉलर बुडवल्याची भीती आहे. झोंगरॉन्ग ट्रस्ट ही मोठी फंड मॅनेजमेंट करणारी कंपनी सुद्धा चार प्रमुख कंपन्याचे कर्ज चुकते करण्यात अपयशी ठरली आहे.

स्थानिक प्रशासनावर कर्जाचा डोंगर

चीनमध्ये लोककल्याणकारी योजनांसाठी निधी जमाविण्याची जबाबदारी असते. लोकल गव्हर्नमेंटच्या नावाखाली स्थानिक प्रशासनावर त्यासाठी दबाव असतो. त्यामार्फत विकासाची कामे, सार्वजनिक सेवांवरील खर्चासाठी निधी जमविण्यात येतो. या लोकल बॉडीजवर 2017 नंतर दुप्पट कर्जाचा डोंगर झाला आहे. 2022 मध्ये त्यांच्यावर जवळपास 7.8 ट्रिलियन डॉलरचे कर्ज झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

जन्मदर घसरला

चीन अनेक कात्र्यांमध्ये अडकला आहे. जागतिक महासत्ता होण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या चीनने अनेक देशांची नाराजी ओढावून घेतली आहे. हुकूमशाही, धाकटपेशामुळे तरुणांमध्ये चीनचे सरकारविरोधात असंतोष आहे. त्यातच कोव्हिंड बंधन, नियमांमुळे जनता रस्त्यावर उतरली होती. हे नियम शिथिल झाल्यानंतर मोठा फरक पडला. सध्या चीनचा जन्मदर खूप घसरला आहे. पूर्व आशियात जपानमधील जन्मदर घसरलेला आहे. चीनमधील जन्मदर त्यापेक्षा कमी झाला आहे.

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.