कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, EPFO चा सदस्यांना दिलासा, दावा निकाली काढण्यासाठी या कागदपत्रांची नाही गरज

EPFO Claim Settlement : ईपीएफओने 6 कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांना क्लेम सेटलमेंट करणे अधिक सोपे झाले आहे. वारंवार या कागदपत्रांची जोडणी करण्याची आता गरज नाही. ईपीएफओने याविषयीचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, EPFO चा सदस्यांना दिलासा, दावा निकाली काढण्यासाठी या कागदपत्रांची नाही गरज
EPFO
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 4:52 PM

ईपीएफओने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. काही प्रकरणात आता त्यांना क्लेम सेटलमेंट करण्यासाठी कॅन्सल चेक वा बँक पासबुकची फोटोकॉपी अपलोड करण्याची गरज उरणार नाही. सर्व अटी आणि शर्तींचे पालन करणाऱ्या सदस्यांना दावे निकाली काढताना विशेष सवलत देण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी सदस्यांना कॅन्सल चेक अथवा बँक पासबुकची गरज नसेल. ऑनलाईन करण्यात येणाऱ्या दावे यामुळे तात्काळ निकाली निघतील. हे दोन्ही कागदपत्र योग्य पद्धतीने अपलोड झाले नाही तर दावा फेटाळण्याचे प्रमाण अधिक होते. कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

ईपीएफओच्या परिपत्रकाने दिलासा

ईपीएफओने 28 मे रोजी याविषयीचे एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, ऑनलाईन दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. चेक लीफ आणि बँक पासबुकची फोटोकॉपी अपलोड करण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे प्रलंबित दावे पण झटपट निकाली निघतील.

हे सुद्धा वाचा

सीपीएफसीने या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. पण ही सवलत काही प्रकरणातच देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. बँक, एनपीसीआयद्वारे बँक केवायसी पूर्ण केलेली आहे. ऑनलाईन व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले आहे. आधारचा पडताळा केला आहे. त्यांच्यासाठी ही सवलत लागू असेल.

अधिकाऱ्यांना दिली सुविधा

ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यांना ही सुविधा काही प्रकरणात असेल. अशा सदस्यांची ओळख पटावी यासाठी अधिकाऱ्यांना काही सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्याने ऑनलाईन व्हेरिफिकेशन पूर्ण केलेल आहे आणि त्याची डिजिटल स्वाक्षरी आहे. त्यांना ओळखण्यासाठी कलर टॅगची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची गल्लत होणार नाही.

ईपीएफओचे 6 कोटींहून अधिक सदस्य आहेत. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुळ वेतनाच्या 12% कपात ईपीएफ खात्यासाठी करण्यात येते. तर कंपनी पण तितकीच रक्कम त्याच्या पीएफ खात्यात जमा करते. कंपनीने जमा केलेल्या रक्कमेतील 8.33% वाटा हा ईपीएसमध्ये (कर्मचारी निवृत्ती योजना) जमा होतो. तर उर्वरीत 3.67% वाटा हा ईपीएफमध्ये जातो.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....