CNG rate : लवकरच सीएनजी, पीएनजीचे दर स्वस्त होण्याची शक्यता, मिळू शकतो मोठा दिलासा

लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो, सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सीटी गॅस पुरवठा कंपन्या सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

CNG rate : लवकरच सीएनजी, पीएनजीचे दर स्वस्त होण्याची शक्यता, मिळू शकतो मोठा दिलासा
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:33 PM

नवी दिल्ली : महागाई सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, खादय तेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तुंच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात सीएनजीच्या (CNG) दरात तर तब्बल चार वेळा वाढ झाली आहे. मात्र आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सीएनजीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार गॅस कंपन्यांसाठी (Citi Gas Companies) सीएनजीच्या दरात कपात (Price Cut) करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्राहकांसाठी सीएनजीचे दर प्रति किलो मागे पाच ते सहा रुपयांनी स्वस्त होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र सीएनजीचे हे दर प्रत्येक कंपनी आपल्या स्थरावर वेगवेगळ्या प्रमाणात कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावामध्ये तफावत पहायला मिळू शकते.

सरकारी कंपनी स्वस्त करणार दर

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मेच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून सरकारी सीएनजी पुरवठादार कंपनी गेल सीटी ही गॅस कंपन्यांना 8.04 डॉलर प्रति एमएमबीटीयू दराने सीएनजी गॅसचा पुरवठा करणार आहे. घरगुती वितरणासाठी तसेच वाहतुकीसाठी ग्राहकांना सीटी कंपन्यांकडून सीएनजीचे वितरण करण्यात येते. सरकारी कंपनीकडून सीटी गॅस कंपन्यांना स्वस्तात सीएनजी उपलब्ध होणार असल्याने या कंपन्या देखील आपल्या किमती कमी करण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारात सातत्याने नॅचरल गॅसच्या किमती वाढत असल्याने त्याचा परिणाम हा भारतात देखील पहायला मिळत असून, गेल्या दीड महिन्यात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र आता लवकरच सीएनजीच्या दरात कपातीची बातमी समोर येऊ शकते.

सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ

पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे वाहनात पेट्रोल टाकने परवडत नाही. त्यामुळे आता अनेक जण सीएनजीच्या पर्यायाकडे वळले आहेत. देशासह राज्यात सीएनजीचे वाहने झपाट्याने वाढत आहेत. सीएनजीची मागणी वाढल्याने सीएनजीच्या किमती देखील आता गगनाला भिडल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात सीएजीच्या दरात चारदा वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 75 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. दुसरीकडे यामध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाची भर पडल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हॅट कपातीचा निर्णय

दरम्यान गेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट कपातीचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार सीएनजीवरील व्हॅट साडेतेरा टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने सीएनजी प्रति किलो पाच रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र चारच दिवसांत सीटी गॅस कंपन्यांनी सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढवल्याने याचा फायदा ग्राहकांना घेता आला नाही.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.