Kunal Kamara : कॉमेडी, कॉमेडियनला हलक्यात घेऊ नका,हा पठ्ठ्या इलेक्ट्रिक बाईक कंपनीला कचाकचा भांडला; एकाच महिन्यात शेअर रेकॉर्डब्रेक आपटला, सीईओचा निघाला घामटा

Comedian Kunal Kamara : विनोद हा जीवनाला नवचैतन्य देणारा, खळखळून हसवणारा, चिंता मुक्त करणारा असतो. विनोदी अभिनेते, अभिनेत्री त्यामुळेच समाजात लोकप्रिय असतात. सध्या काही प्लॅटफॉर्मवर कॉमेडियनची लाट आली आहे. त्यातीलच एका कॉमेडियनच्या तिरकस बाणांनी या कंपनीला घायाळ केले आहे. तिला एकाच महिन्यात जमिनीवर आणले आहे.

Kunal Kamara : कॉमेडी, कॉमेडियनला हलक्यात घेऊ नका,हा पठ्ठ्या इलेक्ट्रिक बाईक कंपनीला कचाकचा भांडला; एकाच महिन्यात शेअर रेकॉर्डब्रेक आपटला, सीईओचा निघाला घामटा
ओला ओला फटका
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 4:18 PM

विनोदाने मन प्रसन्न होते. विनोदामुळे, हसण्यामुळे आयुष्य दुप्पट होते. मनावरील चिंतेचे मळभ दूर होतं. पण कॉमेडियनने तिरकस बुद्धी चालवली तर भल्याभल्यांची बोबडी वळते हे सर्वश्रूत आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने हे दाखवून दिले आहे. उत्पादनानंतरची सेवा आणि गुणवत्तेवरून त्याचे ओला इलेक्ट्रिक कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्याशी चांगलंच वाजलं. X वर त्यांचं भांडणं इतकं गाजलं की, त्याचा जबरी फटका ओला कंपनीला बसला. कंपनीचा शेअर रेकॉर्डब्रेक आपटला.

वाद पुन्हा पेटला

हे सुद्धा वाचा

ओला इलेक्ट्रिक आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) OLA कंपनीला ग्राहकांच्या तक्रारीवर काय कारवाई केली याविषयीची विचारणा केली होती. त्याला कंपनीने उत्तर दिले. त्यानुसार, ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांच्या 10,644 तक्रारींमधील 99.1% तक्रारी सोडवल्याचा दावा करण्यात आला. या दाव्यावर कुणाल कामरा यांनी पुन्हा ओला कंपनीवर निशाणा साधला. “99% ग्राहकांचे समाधान केले म्हणजे 99% बाईक सुरू आहेत?” असा होतो का, असा चिमटा त्याने कंपनीला काढला आहे. या पोस्टला आतापर्यंत 1.3 दशलक्षाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. त्याने हा दावा सपशेल अमान्य केला आहे. उलट जे 1 टक्के ग्राहक आहेत, त्यांचा पण अनुभव शेअर करण्याची विनंती त्याने ओलाकडे केली आहे.

नेटिझन्सची ओलावर तिखट प्रतिक्रिया

या पोस्टनंतर नेटिझन्सनने ओलावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंपनीने तक्रारीवर कशी प्रक्रिया केली, ग्राहकांचे कसे समाधान केले यावर प्रश्नचिन्ह उभं केले आहे. त्यांना कंपनीचा व्यवहार काही आवडलेला नसल्याचे समोर आले आहे. कंपनीने तक्रारी सोडवल्या नाहीत तर त्यांच्या तक्रारीच बंद केल्याचा आरोप काही नेटिझन्सने लावला. तर कामरा याने या सर्व वादावर OLA Electric ला चिमटा काढला आहे. ‘जर तक्रारच नोंदवण्यात येत नसेल तर तक्रार पण राहणार नाही’, असा हा मामला असल्याचा टोला त्याने लगावला.

OLA Electric च्या शेअरला झटका

या वादानंतर ओला कंपनीला शेअर बाजारात मोठा फटका बसला. कंपनीचा शेअर 25 टक्क्यांनी आपटला. ओला इलेक्ट्रिकचा शेअर एनएसईवर 76 रुपये स्वागत मुल्यावर उघडला होता. त्यानंतर त्याने 157.40 अंकांची उच्चांकी कामगिरी बजावली होती. पण या वादाची झालर जसजशी वाढली. तसा कंपनीला मोठा फटका बसला. कंपनीच्या ऑफ्टर सेल सर्व्हिसवर अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात कॉमेडियन कुणाल कामरा हा पण एक आहे. दरम्यान या पडझडीनंतर कंपनीने ग्राहक आयोगाकडे जे उत्तर दाखल केले. त्यानंतर कंपनीचा शेअर 4.45 टक्क्यांनी वधारला. हा शेअर बाजार बंद झाला. तेव्हा घसरून 77.29 वर बंद झाला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.