GST on Rent | हाऊस रेंट अलाऊन्स देताना कंपन्यांना करावा लागणार हजारदा विचार, कंपन्यांना बसेल GST चा फटका, हा नवीन दंडम माहिती आहे का?

GST on Rent News | कंपनीने तुम्हाला रहायला जागा दिली असेल आणि या जागेचे भाडे कंपनी भरत असेल तर आता त्याचा फटका कंपनीला बसणार आहे. कारण या भाड्यावर कंपनीला आता जीएसटी (GST)भरावा लागणार आहे.

GST on Rent | हाऊस रेंट अलाऊन्स देताना कंपन्यांना करावा लागणार हजारदा विचार, कंपन्यांना बसेल GST चा फटका, हा नवीन दंडम माहिती आहे का?
घरभाडे पण जीेएसटीअंतर्गतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 12:39 PM

GST News: जीएसटीने आता आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे. पूर्वी याच्या झळा फार कमी लागत होत्या. मात्र आत जीएसटीचा (GST Impact News) थेट परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर पडत आहे. रोजच्या दैनंदिन वापरतील वस्तू महाग (Daily Items Expensive) झाल्यानंतर जीएसटीचे इतर प्रभाव क्षेत्र हळूहळू समोर येत आहेत. त्यात जागेच्या भाड्याचा (rent of premises) विषय ही प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यामुळे त्याची माहिती तुम्ही करुन घेणे आवश्यक आहे. जीएसटी परिषदेच्या 47 व्या बैठकीतील (GST Council Meeting) निर्णय सोमवार, 18 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत. जर तुमच्या कंपनीने तुम्हाला राहायला घर दिले असेल आणि त्याचे भाडे कंपनी तुम्हाला देत असेल तर या भाड्यावर तुमच्या कंपनीला भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे तुमच्या कंपनीला या भाड्यासंबंधी नव्याने विचार करणे क्रमप्राप्त झाले आहे कारण की, या भाड्यावर कंपनीला 18 टक्के GST द्यावा लागणार आहे. त्यामुळे काही कंपन्या कर्मचाऱ्यांना जागेची सुविधा देताना आता हजारदा विचार करतील हे स्पष्ट आहे.

भाडे कमाई नव्हे तर डोकेदुखी

कंपनीने तुमच्या राहण्याची व्यवस्था केली आणि त्याचे भाडे ही कंपनी तुम्हाला देत असेल तर या भाड्यावर कंपनीला 18 टक्के GST भरावा लागणार आहे. Reverse charge mechanism अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. आता अशा परिस्थिती होम रेंट अलाऊन्सची सोय करणाऱ्या कंपन्यांची ही डोकेदुखी वाढणार आहे. म्हणजेच जागेची सोय करायची आणि अलाऊन्स द्यायचा ही कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. एवढंच नाही तर तुम्ही पगारदार नोकर आहात अथवा छोटे व्यावसायिक आहात आणि तुमचे घर तुम्ही एखाद्या जीएसटी नोंदणीकृत व्यक्तीला किंवा कंपनीला भाड्याने दिले असेल तर तुमची डोकेदुखी वाढलीच म्हणून समजा. कारण अशा भाड्यावर जीएसटी लागू होणार आहे. या निर्णयामुळे कंपनी किंवा जागामालकासाठी करपूर्तता प्रक्रिया वाढणार आहे. भाड्याने दिलेल्या जागेवर ज्याने ती जागा भाड्याने अन्य कोणा व्यक्तीला दिली आहे, त्यासाठी भाड्याने जागा देणाऱ्याला जीएसटी भरावा लागणार हे 13 जुलै रोजी सरकारने स्पष्ट केले होते.

हे सुद्धा वाचा

आता ही आयडियाची कल्पनाही त्रासदायक

कंपनीने भाड्याने जागा कर्मचाऱ्याला राहण्यासाठी दिली तर त्यासाठी कंपनीला जीएसटीचा भूर्दंड पडेल हे निश्चित आहे. कंपनी जी रक्कम भाड्यापोटी कर्मचाऱ्याला देत आहे, त्यावर कंपनीला 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. आता एका आयडियाच्या कल्पनेवर तुम्हाला दंड बसणार आहे. तुम्ही म्हणाल आता हा काय नवीन ताप? तर समजा एखाद्या व्यावसायिकाने त्याच्या स्वतःच्या जागेत कंपनी सुरु केली. करारनामा केला आणि या कंपनीला जागेचे भाडे आकारले तर तो त्याच्या कमाईचा भाग होता. आता मात्र त्याला कागदोपत्री केलेल्या कमाईवर जीएसटी द्यावा लागणार आहे. सरकारने (Government) ही तुमच्या आयडियावर ही शक्कल लढवली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.