IPO : कंडोम कंपनी करुन देणार कमाई..गुंतवणुकीसाठी तयार रहा..

IPO : कंडोम म्हटलं की ओशाळता, घाबरता, रागवता, खासगीचा विषय सांगता. पण तुम्हाला लवकरच कंडोम उत्पादन करणाऱ्या कंपनीत गुंतवणूकदार असल्याचे सांगता येणार आहे.

IPO : कंडोम कंपनी करुन देणार कमाई..गुंतवणुकीसाठी तयार रहा..
कंडोम कंपनीतून कमाईची संधी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 5:10 PM

नवी दिल्ली : कंडोम (Condom) म्हटलं की पहिली रिअॅक्शन काय येते.. टेन्शन, नको तो विषय, एक्साईटमेंट, काय वंगाळ बोलता राव तुमच्या अशा प्रतिक्रिया (Reaction) येतील. पण तुम्हाला लवकरच कंडोम उत्पादन करणाऱ्या कंपनीत गुंतवणूकदार (Investment) असल्याचे सांगता येणार आहे. कंपनीच्या कंडोम विक्रीचा आकडा पाहता, ही गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मॅनफोर्स (Manforce) कंडोमचे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, नाही का? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. तर या प्रश्नातच तुमची कमाई लपलेली आहे मित्रांनो.  मॅनफोर्स कंडोम हा तुमच्यासाठी कमाईचा मार्ग ठरू शकतो.

मॅनकाईंड फार्मा (Mankind Pharma) ही कंपनी या कंडोमचे उत्पादन करते. आता ही कंपनी लवकरच बाजारात आयपीओ (IPO) आणणार आहे. त्यासाठी कंपनीने सोपास्कारही पार पाडले आहेत.

हे सुद्धा वाचा

कंपनीने भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे(SEBI) आयपीओ बाजारात दाखल करण्यासाठी तयारी केली आहे. कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस(DRHP) दाखल केला आहे.

या आयपीओचे बाजार भांडवल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कारण या आयपीओचा आकार 5,500 कोटी रुपये इतका असणार आहे. आतापर्यंत स्वदेशी औषध कंपन्यांनी सादर केलेल्या आयपीओ साईजपेक्षा ही मोठी गुंतवणूक ठरणार आहे.

घरीच गर्भधारणा ओळखण्यासाठी बाजारात प्रेगा न्यूज किट उपलब्ध आहे. ही किट मॅनकाईंड फार्मा या लोकप्रिय कंपनीचे उत्पादन आहे.

आयपीओ कंपनीत प्रोमटर्स आणि सध्याच्या शेअरधारकांचे एकूण चार कोटी इक्विटी शेअर आहे. त्याची विक्री करण्याची तयारी करण्यात आली आहे. या शेअर्सवर आयपीओचा डाव रंगणार आहे.

मॅनकाईंड फार्माचे प्रमोटर रमेश जुनेजा, राजीव जुनेजा, शीतल अरोडा, रमेश जुनेजा फॅमिली ट्रस्ट, राजीव जुनेजा फॅमिली ट्रस्ट आणि प्रेम शीतल फॅमिली ट्रस्ट आहे.

या कंपनीचे औषध क्षेत्रात अनेक उत्पादने आहेत. त्याशिवाय ही कंपनी प्रेगा न्यूज प्रेग्नंसी टेस्टिंग किट, मॅनफोर्स कंडोम आणि गैस-ओ-फास्ट या उत्पादनांसाठी नावाजलेली आहे.

या कंपनीने 31 मार्च 2021 रोजी सरत्या आर्थिक वर्षात 1,084,37 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमाविला आहे. आता यावरुन या कंपनीत गुंतवणूक करणे किती फायदेचे ठरेल हे वेगळं सांगायची गरज आहे का?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.