रोजगारावर आता कोरोनाचा परिणाम जाणवणार नाही, नोकऱ्या मिळत राहणार – सर्व्हे

कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती आता निवळली असताना विविध क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मते आता देशातील कोणत्याही भरती प्रक्रियेत कोरोनाचा प्रतिकूल प्रभाव दिसणार नाही. या मतावर देशभरातील जवळपास 73 टक्के लोकांचं एकमत आहे. तर 27 टक्के लोक भविष्यातील स्थितीबाबत आश्वस्त नाहीत. जिनियस कन्सल्टेशनकडून याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती देण्यात आली आहे.

रोजगारावर आता कोरोनाचा परिणाम जाणवणार नाही, नोकऱ्या मिळत राहणार - सर्व्हे
बेरोजगारी समस्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 10:33 AM

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी आपले प्राण गमावले. अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले (Business closed). त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. या महामारीमुळे देशात बेरोजगारीची समस्या (Unemployment) अतिशय गंभीर बनली. अशावेळी एक सकारात्मक बातमी आलीय. कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) काहीसा कमी होत असताना, तसंच कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती आता निवळली असताना विविध क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मते आता देशातील कोणत्याही भरती प्रक्रियेत कोरोनाचा प्रतिकूल प्रभाव दिसणार नाही. या मतावर देशभरातील जवळपास 73 टक्के लोकांचं एकमत आहे. तर 27 टक्के लोक भविष्यातील स्थितीबाबत आश्वस्त नाहीत. जिनियस कन्सल्टेशनकडून याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती देण्यात आली आहे.

हे सर्वेक्षण बँकिंग, अभियांत्रिकी, शिक्षण, एफएमसीजी, पर्यटन, मानव संसाधन विकास, आयटी, आयटीईएस आणि बीपीओ, लॉजिस्टिक्स, पुनर्निमाण, माध्यम, तेल आणि गॅस, तसंच फार्मासह विविध क्षेत्रातील 1 हजार 468 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. 69 टक्क्यांपेक्षा अधिक जणांना आता कोरोना विषाणूचा नवा प्रकार आला तरी नोकरीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वाटत नसल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय. कोरोना विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक नसेल असं मत 71 टक्के लोकांनी व्यक्त केलंय.

2023 पर्यंत बेरोजगारीची संख्या कोरोना पूर्व स्तरावर राहील

काही दिवसांपूर्वी बेरोजगारीच्या मुद्द्यावर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा एक अहवाल समोर आला होता. त्यात बेरोजगारीची संख्या 2023 पर्यंत कोरोनापूर्व स्थितीत होती त्या स्तरावर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये जगभरात बेरोजगारांची संख्या 20.7 कोटी राहील. 2019 मधील बेरोजगारीच्या तुलनेत 2.1 कोटी अधिक आहे. आयएलओने आपल्या अहवालात सांगितलं आहे की, 2019 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत जागतिक स्तरावर कामाच्या तासांमध्ये झालेली घट 52 दशलक्ष पूर्ण रोजगारा एवढी आहे. 2021 मध्ये ही कमतरता2.6 कोटी पूर्ण रोजगारा एवढी असण्याचा अंदाज होता.

नेमकं वास्तव काय?

कोरोनामुळे लेबर मार्केटबाबतचे सर्व अहवाल हे वास्तवापासून कोसो दूर आहेत. या महामारीमुळे मोठ्या संख्येनं मजूर काम सोडून गेले आहेत. या मजूरांचा आकडेवारीत समावेश नाही. कोरोनाच्या दुसऱ्या आणि आताच्या तिसऱ्या लाटेमुळे लेबर मार्केटमधील भावना कमकुवत झालीय. तसंच लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. भविष्यात कोरोनाची महामारी कोणतं रुप घेईल, याची भीती हजारो कामगारांच्या मनात आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.

इतर बातम्या :

नव्या कारसाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार? रशिया-यूक्रेन युद्धामुळे चिपची कमतरता

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबईत उभारले देशातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर, 5G नेटवर्क बरोबरच खूप साऱ्या मिळतील सुविधा !

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.