Construction Materials | एक बंगला बने न्यारा! सिमेंटसह सळईच्या किंमती घसरल्या, नवीन प्रकल्पांना फायदा

Construction Materials | पावसाळा आणि सरकारच्या धोरणांमुळे सिमेंटच्या किंमती घसरल्या आहे. त्यामुळे घर बांधण्याचा खर्च कमी झाला आहे.

Construction Materials | एक बंगला बने न्यारा! सिमेंटसह सळईच्या किंमती घसरल्या, नवीन प्रकल्पांना फायदा
बांधकाम साहित्याच्या दरात घसरणImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 5:34 PM

Construction Materials | स्वप्नातील इमाला बांधण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण घर बांधकामसाठी (Home Construction Materials) लागणाऱ्या साहित्याचे दर झरझर खाली उतरले आहेत. एप्रिल ते जून महिन्यात नवे नवे उच्चांक नोंदवणाऱ्या सिमेंट (Cement), स्टील(Steel) आणि सळईच्या (slay) किंमतीत मोठी घसरण झाली आहे. देशातील ज्या शहरात या साहित्याचे उत्पादन होते. तिथे सिमेंट, सळईने महागाईचा उच्चांक (Inflation) गाठला होता. त्यानंतर सरकारने हस्तक्षेप केला. त्यानंतर जूनच्या मध्यानंतर किंमतीत घट आली. त्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने घर बांधण्याची प्रक्रिया मंदावली. ग्राहकांनी माल खरेदी न केल्याने किंमती आटोक्यात आल्या आहेत. आता घर बांधण्यासाठीच्या या साहित्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे अशात तुम्ही घर बांधायचा विचार करत असाल तर हा चांगला काळ म्हणता येईल.

साहित्याच्या किंमती घटल्या

सरकारने बांधकाम साहित्याच्या किंमती घटल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, टीएमटी सळईचा घाऊक भाव 65 हजार रुपये प्रति टन रुपयांच्या जवळपास पोहचला आहे. हा भाव एप्रिल महिन्यात 75 हजार रुपये प्रति टन इतका होता. तर सळईचे किरकोळ भाव 60 हजार रुपये प्रति टनाहूनही खाली उतरला आहे. एप्रिल महिन्यात हाच भाव 80 हजार रुपयांच्यावर पोहचला होता. तर ब्रँडेच सळईचा भाव एप्रिल महिन्यात एक लाख रुपये प्रति टनवर पोहचला होता. हा भाव आता 85 हजार रुपये प्रति टनाहूनही खाली घसरला आहे. यासोबतच सिमेंटच्या भावात ही घसरण दिसून आली. एप्रिल महिन्यात 50 किलो सिमेंटची थैली 450 रुपयांच्यावर पोहचली होती. सध्या हा भाव 400 रुपयांहून ही घसरला आहे. विटांच्या किंमतीत ही घसरण दिसून येत आहे. घर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जसे टाईल्स, वाळू आणि राख यांच्या किंमतीत ही घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

किंमतीत घसरण का?

घर तयार करण्यासाठी जे साहित्य वापरण्यात येत आहे. त्याच्या किंमतीत अचानक घट का झाली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एप्रिल ते जून महिन्यात बांधकाम साहित्याचे दर गगनाला पोहचले होते. त्यामुळे घर बांधावे पाहून या मराठी म्हणीचा अनुभव अनेकांनी खऱ्याअर्थांनी घेतला होता. सध्या दर घसरले आहेत. साधारणता ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा घरबांधणीचा श्रीगणेशा होतो. त्याआधीच सरकारने भाव कमी होण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत. सरकारने स्टीलचे निर्यात शुल्क वाढवले होते. त्यावर एक्स्पोर्ट ड्युटी वाढवल्याने स्थानिक बाजारात स्टीलचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. त्यामुळे स्टीलचे भाव खाली आले. तर पावसाळ्यामुळे उठाव नसल्यानेही भाव घसरले आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.