Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rich Banker : देशातील चौथ्या बँकेचा ‘उदय’, सर्वात श्रीमंत बँकर्सला निवृत्तीचे वेध

Rich Banker : भारतीय बँकिंग क्षेत्रात अनेक दिग्गज आहेत. त्यांनी मोठमोठ्या बँका उभ्या केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक बँका भारतात उदयास आल्या. देशातील चौथ्या बँक उभारणीत या व्यक्तीचे योगदान सर्वात मोठे आहे. कोणती आहे ही बँक, कोण आहे हे श्रीमंत बँकर्स..

Rich Banker : देशातील चौथ्या बँकेचा 'उदय', सर्वात श्रीमंत बँकर्सला निवृत्तीचे वेध
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 6:14 PM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : भारतीय बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) अनेक दिग्गज आहेत. त्यांनी मोठमोठ्या बँका उभ्या केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक बँका भारतात उदयास आल्या. एचडीएफसी, भारतीय स्टेट बँक यांच्या उभारणीच्या अनोख्या कथा आहेत. या बँका उभारणीमागे एक ठोस कारण आहे. व्यावसायिकता तर डीएनए आहे. पण बँक उभारणे हा काही एका दिवसाचा टप्पा नक्कीच नाही. बँक उभारण्यासाठीचे सुक्ष्म नियोजन, दीर्घ काळासाठीचा आराखडा, मेहनत, दूरदृष्टी आणि उद्दिष्ट अशा अनेक गोष्टींचा परिपाक व्हावा लागतो. आज एचडीएफसीने (HDFC Bank) मोठा पल्ला गाठला आहे. जागतिक नकाशावर ही बँक आली आहे. देशात इतर बँका ही इतिहास रचत आहे. देशातील चौथ्या बँक उभारणीत या व्यक्तीचे योगदान सर्वात मोठे आहे. कोणती आहे ही बँक, कोण आहे हे श्रीमंत बँकर्स..

कोण होत आहे रिटायर

कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक (Uday Kotak) यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. ते निवृत्त होत आहे. डिसेंबर महिन्यात ते पायउतार होतील. कोटक हे बोर्ड गव्हर्नेस मेंबर आणि स्ट्रॅटेजिक शेअर होल्डर म्हणून बँकेशी जोडलेली राहातील.

हे सुद्धा वाचा

अशी झाली सुरुवात

कोटक महिंद्रा या बँकेची सुरुवात 38 वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी 300 चौरस मीटर कार्यालयात 13 कर्मचाऱ्यांसह हा प्रवास सुरु झाला. त्यावेळी सर्वच जण संभ्रमात होते. हा प्रयोग फसतो की चालतो हे कोणालाच माहिती नव्हते. पण आज ही भारतातील सर्वात मोठी चौथी बँक आहे.

अनेक वर्षांचा प्रवास

उदय कोटक यांनी 1985 पासून एनबीएफसी आणि पुढे 2003 पासून व्यावसायिक बँकेच्या रुपात कोटक महिंद्रा बँकेचे नेतृत्व केले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावरुन बाजूला व्हावे लागेल. या पदावर ते गेल्या 15 वर्षांपासून आहेत.

इतकी आहे संपत्ती

फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार (Forbes rich List 2023) आज उदय कोटक भारताचे दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती (Uday Kotak Net Worth) 1.15 लाख कोटी रुपये आहे. ते भारतातील सर्वात श्रीमंत बँकर आहेत.

क्रिकेटरचे स्वप्न भंगले

उदय कोटक यांचा जन्म मुंबईतील. त्यांना लहानपणापासून क्रिकेटचे वेड होते. वाणिज्य शाखेतील पदवी नंतर त्यांनी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीमधून एमबीए पूर्ण केले. त्यांना क्रिकेटर व्हायचे होते. पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

वित्तीय संस्थेसाठी उधारी

कोटक कुटुंबिय कापसाचा व्यापार करत. उदय कोटक यांना वित्तीय सेवा संस्था सुरु करायची होती. नातेवाईक आणि मित्रांकडून त्यांनी 30 लाख रुपये उधार घेतले. 1985 मध्ये त्यांनी ही वित्तीय आणि गुंतवणूक कंपनी सुरु केली. त्याचवेळी महिंद्रा समूह पण आला. या कंपनीचे नाव कोटक महिंद्रा फायनान्स असे ठेवण्यात आले.

2003 मध्ये बँकेचा परवाना

या वित्तीय संस्थेला 2003 मध्ये बँकेचा परवाना मिळाला. आज कोटक महिंद्रा बँक खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक आहे. या बँकेचे बाजारातील भांडवल 3.74 लाख कोटी रुपये आहे. या बँकेने सध्या 1 लाखांपेक्षा अधिक लोकांना थेट रोजगार दिला आहे.

अशी फुलली प्रेमकथा

उदय कोटक यांचे लग्न पल्लवी यांच्यासोबत झाले. 1985 मध्ये दोघांची पहिली भेट झाली. दोनच महिन्यात उदय यांनी पल्लवी यांना लग्नासाठी मागणी घातली. उदय कोटक यांना दोन मुलं आहेत.

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.