Crorepati | अचानक उघडलं नशीब! रात्रीतून झाले करोडपती

Crorepati | बरेचदा राशीभविष्य वाचताना अचानक धनलाभ होईल, असा मजकूर डोळ्यासमोर येतो, त्यावेळी अनेकांना गुदगुल्या होतात. देशातील अशाच काहींच्या आयुष्यात हा चमत्कार झाला आहे. अचानक त्यांच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम येऊन पडली. त्यांचा आनंदात गगनात मावेनासा झाला. कोण आहेत ही मंडळी..

Crorepati | अचानक उघडलं नशीब! रात्रीतून झाले करोडपती
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 9:39 AM

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : तुमच्या बँकेच्या खात्यात अचानक अब्जावधी रुपये आले तर? पहिल्यांदा विश्वास बसणार नाही, हा धक्का पचवणं अवघड जाईल. त्यानंतर आपल्याच खात्यात इतकी रक्कम जमा झाल्याने तुम्हाला भीती वाटेल, आनंद होईल, संमिश्र प्रतिक्रिया उमटतील, नाही का? अचानक भलीमोठी रक्कम खात्यात जमा झाल्याने सहाजिकच हर्षवायू होऊ शकतो. देशात अशात काही घटना घडल्या आहेत. त्यात सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आहे. ही मंडळी रात्रीतूनच श्रीमंत झाली आहेत. त्यांना एकदम लॉटरी लागली आहे. कोण आहेत या व्यक्ती? पुढे त्या रक्कमेचे काय झाले.

  1. शिवप्रसाद निषाद – उत्तर प्रदेशातील शिवप्रसाद निषाद यांच्या घरी आयकर खात्याने नोटीस पाठवली. शिवकुमार दिल्लीत दगडाला आकार देण्याचे काम करतात. त्यांच्या खात्यात 221 कोटींचा व्यवहार झाल्याचा दिसून आले. 2019 मध्ये त्यांचे पॅनकार्ड हरवले होते. त्यांच्या खात्यात इतकी उलाढाल झाल्याचे त्यांच्या गावी पण नव्हते. ज्या खात्यात ही भलीमोठी रक्कम झाली, ते त्यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले. पण या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या आयकर विभाग आणि पोलीस याप्रकरणात चौकशी करत आहेत.
  2. टॅक्सी ड्रायव्हर राजकुमार – एका महिन्यापूर्वी तामिळनाडूचे टॅक्सी ड्रायव्हर राजकुमार यांच्या बँक खात्यात 9000 कोटी रुपये जमा झाले. हा एसएसएम येताच त्यांना धक्का बसला. ते निक्करपट्टी या गावचे रहिवासी आहेत. 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली होती. तामिळनाडू मर्केंटाईल बँकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली होती. बँकेने चुकून ही रक्कम त्यांच्या खात्यात पाठवली होती.
  3. मुहम्मद इदरीस – चेन्नईतील एका मेडिकल मुहम्मद इदरीस हा काम करतो. तेनामापेट भागात हे मेडिकल आहे. 7 ऑक्टोबर रोजी कोटक महिंद्रा बँकेतील खात्यातून त्याने मित्राला 2000 रुपये पाठवले. खात्यात किती रक्कम उरली हे पाहण्यासाठी त्याने बँलेन्स तपासले. तेव्हा त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये असल्याचे त्याच्या लक्षात आले. तांत्रिक कारण पुढे करत बँकेने त्याचे खाते गोठवले.
  4. विक्रमचे नशीब पाटलटे – सप्टेंबर महिन्यात हरियाणातील विक्रमचे असेच नशीब पालटले. तो मजूरीचे काम करतो. त्याच्या खात्यात अचानक 200 कोटी रुपये जमा झाले. बेरला हे त्याचे गाव आहे. त्याने तातडीने बँकेशी संपर्क साधला. सध्या ही रक्कम थांबवून ठेवण्यात आली आहे. चौकशी सुरु आहे.
  5. हे सुद्धा वाचा

  • के गणेशन झाले श्रीमंत – तामिळनाडूतील के. गणेशन यांच्यासोबत पण असेच घडले. ते तंजावूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या बँक खात्यात अचानक 756 कोटी रुपये जमा झाले. त्यांनी तातडीने बँकेला ही माहिती दिली. तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडल्याचे बँकेने मान्य केले. ही रक्कम परत घेण्यात आली.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.