Petrol-Diesel Price : आठवडाभरातच कच्च्या तेलाची उसळी, पेट्रोल-डिझेल महागणार का, आजचे भाव एका क्लिकवर

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने उसळी घेतली. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार का?

Petrol-Diesel Price : आठवडाभरातच कच्च्या तेलाची उसळी, पेट्रोल-डिझेल महागणार का, आजचे भाव एका क्लिकवर
इंधन दरवाढ होणार?
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च 2022 मध्ये कच्चा तेलाचे वाढलेले भाव (Crude Oil Price) एकदम जमिनीवर आले. हा भाव नीच्चांकी स्तरावर पोहचला. क्रूड ऑईलचे दर 50 डॉलर प्रति बॅरलवर आले. त्यानंतर हा भाव थोडा वधरला. मध्यंतरी क्रूड ऑईल 80-87 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. गेल्या आठवड्यात क्रूड ऑईलमध्ये जवळपास 9 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कपात होण्याची शक्यता आता मावळली आहे. तेल विपणन कंपन्या अगोदरच तोट्याची दवंडी पिटत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीही कंपन्यांचा तोटा भरून निघत नाही, तोपर्यंत कोणताच दिलासा न देण्याचे संकेत दिले आहेत.

शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. 22 मे नंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. किंमती स्थिर आहेत. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश राज्य सरकारने वॅटमध्ये वाढ केली. त्याचा डिझेलच्या किंमतीवर परिणाम दिसला. किंमतीत जोरदार वाढ झाली.

दिल्लीत सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये (Auto Expo 2023) गडकरी यांनी याविषयावर मत मांडले. भारत हा पर्यायी इंधनावर गंभीरतेने विचार करत आहे. काही वाहन निर्माता कंपन्या आता 100 टक्के बायोइथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे आपोआप पेट्रोलचा खर्च वाचणार आहे.

हे सुद्धा वाचा

देशभरात इथेनॉल पंप सुरु करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या योजनेवर काम सुरु आहे. त्यासाठी येत्या 15 दिवसांत पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची गडकरी भेट घेतील. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची योजना आहे. त्यासाठी 1,000 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 1.74 टक्क्यांची वाढ झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा परिणाम दिसून आला. किंमती 85.49 डॉलर बॅरलवर पोहचल्या. गेल्या आठवड्यात 6 जानेवारी रोजी ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव 78.57 डॉलर होते.

त्यानंतरच्या पाच दिवसांत ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 8 डॉलर प्रति बॅरलची वाढ दिसून आली. याचा अर्थ गेल्या आठवडाभरात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. कच्चा तेलाच्या किंमतीत आठवडाभरात चांगलीच तेजी होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन क्रूड ऑईल डब्ल्यूटीआई 80.07 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात डब्ल्यूटीआईमध्ये 2.14 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. गेल्या आठवड्यात 6 जानेवारी रोजी हे भाव 73.69 डॉलर प्रति बॅलर होते. म्हणजेच किंमतीत 6.38 डॉलर प्रति बॅरलची वृद्धी दिसून आली. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलवर होईल का?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.