Petrol Diesel Rate Today : एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी मोजा इतके रुपये, आजचा भाव एका एसएमएसवर

Petrol Diesel Rate Today : तेल कंपन्यांनी सकाळीच भाव जाहीर केला. कच्चे तेल घसरल्याने तुमच्या शहरात आनंदवार्ता येऊन धडकली का? पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी मोजा इतके रुपये, आजचा भाव एका एसएमएसवर
पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 8:23 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारातून आनंदवार्ता येऊन धडकली आहे. कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) घसरल्या आहेत. सातत्याने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आहेत. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मार्च 2022 मध्ये  क्रूड ऑईलच्या किंमती सर्वाधिक प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून या किंमती या घसरणीवरच आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) जाहीर केले. कच्चे तेल घसरल्याने तुमच्या शहरात आनंदवार्ता येऊन धडकली का? कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले.

कच्चे तेल घसरले जागतिक बाजारात आज कच्चे तेल घसरले. 24 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 73.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 69.16 डॉलर प्रति बॅरल झाला होता. 22 जून रोजी या किंमती अनुक्रमे 77.04 डॉलर प्रति बॅरल आणि 72.47 डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या.

भाव एका SMS वर

हे सुद्धा वाचा
  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

गेल्यावर्षी करात कपात केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

करासंबंधी असा झाला बदल

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड होती.
  11. केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना मोठी आर्थिक मदत केली

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.