Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव, आज किंमत वाढली की मिळाला दिलासा

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर घसरले आहेत. या भावांआधारे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होतो. आज वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी इंधनाचे दर जाणून घ्या.

Petrol Diesel Price : टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव, आज किंमत वाढली की मिळाला दिलासा
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 8:38 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात (Crude Oil Price) पुन्हा एकदा घसरण झाली. गेल्या दोन महिन्यांपासून इंधनाच्या दर जमिनीवर आहेत. त्यात मामुली तफावत दिसून येते. भाव किंचित वधरतात आणि पुन्हा घसरतात. भावातील हा बदल भारतीय तेल विपणन कंपन्यांच्या पथ्यावर पडत आहे. आजही कच्चे तेल घसरले. त्याआधारे तेल विपणन कंपन्या देशात पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) निश्चित करतात. तेलाच्या किंमती 75 ते 87 डॉलर प्रति बॅरलच्या आतच खेळत आहे. अनेक दिवसांपासून भावात कपात करण्याची मागणी जोर धरत आहे. पण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि तेल कंपन्यांनी (OMCs) अधिकृतपणे याविषयीची भूमिका जाहीर केलेली नाही. आज वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी इंधनाचे दर जाणून घ्या.

14 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) घसरुन 74.77 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 80.78 डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झाला होता. त्यावेळी उत्पादन शुल्क कपात करण्यात आले होते. त्यानंतर मात्र मोठा बदल झालेला नाही. आज, तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले.

तेल पुरवठ्याविषयी अपडेट

हे सुद्धा वाचा
  1. सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  2. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  3. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  4. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  5. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.51 तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.85 पेट्रोल आणि डिझेल 94.31 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.41 आणि डिझेल 92.92 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.44 तर डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 93.21 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.38 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.72 रुपये तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.