Petrol Diesel Price Today : कच्चे तेल गडगडले, पण परभणी, नांदेड, औरंगाबादकरांना नाही दिलासा
Petrol Diesel Price Today : आज जागतिक बाजारात कच्चा तेलाने आनंदवार्ता आणली. कच्चा तेलाची घसरगुंडी उडाल्याने पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला. पण परभणी, नांदेड, औरंगाबादकरांना कुठलाही दिलासा मिळाला नाही.
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने आनंदवार्ता आणली. गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलात चढउतार सुरु असला तरी मोठी वाढ झाली नाही. आज 4 मे रोजी मात्र क्रूड ऑईलने पिच्छे मुडचा कदमताल केला. कालही कच्चा तेलात किंचित घसरण झाली होती. आज कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 71.52 वरुन थेट 67.94 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरले. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 75.19 डॉलरहून 71.82 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले. कच्चा तेलाची घसरगुंडी उडाल्याने पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला. पण परभणी, नांदेड, औरंगाबादकरांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. या शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) आज कालपेक्षा जास्त आहे.
मोठा बदल नाही केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही. . प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices) गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
पेट्रोल-डिझेल का होत नाही स्वस्त भारत रशियाकडून स्वस्तात कच्चा तेल खरेदी करत आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत काहीच बदल झाला नाही. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलच्या किंमती सर्वाधिक प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. एक लिटर पेट्रोलमागे कंपन्यांना विक्रमी 17.4 रुपये आणि डिझेलमागे 27.7 रुपयांचा तोटा झाला. तेव्हा जनतेचा रोष नको म्हणून पेट्रोल-डिझेलचा भाव वाढविण्यात आला नाही. त्यावेळच्या तोट्याची भरपाई कंपन्या करुन घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
- मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
- अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
- अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- जळगावमध्ये पेट्रोल 107.64 आणि डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 108.04 तर डिझेल 94.51 रुपये प्रति लिटर
- नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
- परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
- पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
- सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
- ठाणे पेट्रोलचा दर 106.01 रुपये तर डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर