Petrol-Diesel Price : ..तर इतके स्वस्त व्हायले हवे पेट्रोल-डिझेल, कच्च्या तेलाचे भाव पाहता, नवीन दरात एवढा पडेल फरक..

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर इतक्या रुपयाने कमी होऊ शकतात..

Petrol-Diesel Price : ..तर इतके स्वस्त व्हायले हवे पेट्रोल-डिझेल, कच्च्या तेलाचे भाव पाहता, नवीन दरात एवढा पडेल फरक..
पेट्रोल डिझेल होणार स्वस्त?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 5:33 PM

नवी दिल्ली : भारतीयांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) कमी होण्याची प्रतिक्षा आहे. पण अद्यापही सरकारी तेल कंपन्यांनी याविषयीचा निर्णय घेतला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर (Lowest Level) पोहचल्या आहेत. आता या किंमती पुन्हा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या किंमती किती रुपयाने उतरतील याविषयीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड (Brent Crude) तेलाचे भाव सोमवारी 2.6 डॉलर/बॅरल म्हणजेच 3 टक्क्यांहून कमी झाले. हा भाव 80.97 डॉलर प्रति बॅरल होता. या वर्षाच्या सुरुवातीला 4 जानेवारीनंतर हा सर्वात कमी भाव आहे.  त्यामुळे कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे.

ब्रेंट क्रूडमध्ये आलेली किंमतीतील घसरणीमुळे भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. भारतीय कंपन्या जे कच्चे तेल खरेदी करतात, त्यांचा खर्च आता 112.8 डॉलर प्रति बॅरलवरुन 82 डॉलर प्रति बॅरलवर येऊन ठेपला आहे. त्याचा फायदा कंपन्यांना होत आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या अनेक दिवसांपासून कच्चा तेलावर खर्च कमी झाल्याने भारतीय तेल उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे नागरिकांना लवकरच कमी भावात इंधन उपलब्ध होईल.

भारतीय तेल कंपन्यांना 30 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा पेट्रोल-डिझेल मागे नुकसान होत असल्याचा दावा कितपत टिकतो, हे लवकरच समोर येईल. पण या डाटाच्या आधारे तेल कंपन्यांवर भाव कमी करण्याविषयीचा दबाव वाढला आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांना गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त मिळत असल्याने, पेट्रोलच्या भावात 6 रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या दरात 5 रुपये प्रति लिटर घसरण होण्याची शक्यता आहे. आता हा फायदा कधी मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.