Petrol-Diesel Price : मोठी बातमी! कच्चे तेल आपटले, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरच कपातीची शक्यता बळावली आहे. बजेटनंतर तुमच्या खिशावरील भार कमी होण्याची शक्यात आहे.

Petrol-Diesel Price : मोठी बातमी! कच्चे तेल आपटले, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) आघाडीवर सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव (Crude Oil Price) 80 डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली आला. गेल्या काही दिवसांपासून भावात सातत्याने चढ-उतार होत असला तरी पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा भरुन निघण्यासाठी मदत नक्कीच झाली आहे. डबल्यूटीआई क्रूड 80 डॉलर प्रति बॅरलवरुन 79.68 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. भारतात कच्चा तेलाची खरेदी किंमत 80 डॉलर प्रति बॅरलवरुन 79.98 प्रति डॉलरवर पोहचली आहे.  काल ब्रेंड क्रूड ऑईलच्या भावात 0.93 टक्क्यांची घसरण होऊन ते 86.66 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआईमध्ये (WTE) 1.64 टक्क्यांची घसरण होऊन ते 79.68 डॉलर प्रति बॅरलवर होते.  या घसरणीचा फायदा लवकरच भारतीय वाहनधारकांना मिळू शकतो.

काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दर कमी होण्याचे एका अटीवर संकेत दिले होते. सरकारी तेल विपणन कंपन्यांचे नुकसान जर भरुन निघाले तर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होऊ शकते, असा दावा त्यांनी केला होता. आता ही वेळ आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर जवळपास 5 रुपये प्रति लिटरचा फायदा होत आहे. तर डिझेलच्या विक्रीवर जवळपास 13 रुपये प्रति लिटरचा तोटा होत आहे. जर क्रूड ऑईलच्या किंमती 80 डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी राहिल्या तर कंपन्यांचा तोटा भरुन निघण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा

येत्या फेब्रुवारी 2023 मध्ये कच्चा तेलाच्या भावात अजून घसरणीची शक्यता आहे. सौदी अरबने कच्चा तेलाचे भाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी रोजी सौदी सरकारची (Saudi Government) सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सऊदी अरमॅकोने (Saudi Aramco) सर्व प्रकारच्या कच्चा तेलाचे दाम कमी करण्याचा निर्णय जाहीर केले आहे.

सौदी अरब 60 टक्के कच्चे तेल दीर्घकालीन करारावर आशियात निर्यात करते. दर महिन्याला किंमतीचा आढावा घेण्यात येतो. भारत, चीन, जापान आणि दक्षिण कोरिया हे देश सौदीचे मोठे आयातदार देश आहेत.

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.37 रुपये आणि डिझेल 93.91 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 106.42 पेट्रोल आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.