Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाने महागाईचा ग्राफ उंचावला! पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ

Petrol Diesel Price Today : कच्चे तेल सर्वच अर्थव्यवस्थांना रडवणार असे दिसत आहे. युरोप आणि अमेरिकेला धडा शिकवण्याच्या नादात ओपेक आणि रशियाने संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. त्याचा फटका भारतालाही बसू शकतो.

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाने महागाईचा ग्राफ उंचावला! पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली : कच्चे तेल (Crude Oil) सर्वच अर्थव्यवस्थांना रडवणार असे दिसत आहे. युरोप आणि अमेरिकेला धडा शिकवण्याच्या नादात ओपेक (OPEC) आणि रशियाने संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय ओपेक संघटनेने जाहीर केला. त्यापूर्वी रशियाने जूनपर्यंत कच्चा तेलाचे उत्पादन घटवले. हा दबावतंत्राचा भाग आहे. त्यामुळे घसरलेल्या कच्चा तेलाच्या किंमतींना बळ मिळाले. या किंमतीत अवघ्या चार दिवसात मोठी वाढ झाली. किंमती अजून भडकल्या आणि कच्चे तेल 100 डॉलरच्या जवळपास गेले तर अनेक अर्थव्यवस्था खिळखिळ्या होतील. त्याचा फटका भारतालाही बसू शकतो. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) वाढतील.

कच्चा तेलाचा भाव काय आज शनिवारी, 8 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.70 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.12 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

हे सुद्धा वाचा
  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.81 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.50 आणि डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.63 आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.92 तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.79 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.69 आणि डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त
पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त.
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल.
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?.
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण.
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?.
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?.
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'.
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ.
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय.