today Petrol Diesel price: कच्च्या तेलाच्या दरात तेजी, इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात इंधनाचे दर स्थिर आहेत.

today Petrol Diesel price: कच्च्या तेलाच्या दरात तेजी, इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल डिझेलचे दर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 6:44 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price today) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या सहा एप्रिलपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) वाढत असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल 113 डॉलरवर पोहोचले आहे. भारतात 22 मार्च ते सहा एप्रिल 2022 या काळात पेट्रोल (Petrol), डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती. पेट्रोल, डिझेलचे दर या काळात प्रति लिटर मागे दहा रुपयांहून अधिक वाढले. मात्र सहा एप्रिल नंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर झालेल्या नव्या दरानुसार आज देखील राज्यात पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 120.40 व 103.73 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 तर डिझेलचा दर 103.10 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104. 50 रुपये इतका आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये आहे तर डिझेलचा भाव प्रति लिटर 106 रुपये लिटर आहे.

इतर इंधनाच्या दरात वाढ

एकीकडे देशात गेल्या महिनाभरापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे एलपीजी, सीएनजी, पीएनजी आणि जेट फ्यूलच्या दरात वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. सीएनजीचे दर गेल्या महिनाभरात तीनदा वाढले आहेत. एक मेला व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्या आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी घरगुती सिलिंडर देखील महाग झाला असून, घरगुती सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जेट फ्यूलमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.