कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज पेट्रोल, डिझेलचे (Petrol & Diesel) दर स्थिर असून, दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्राकडून गेल्या आठवड्यात पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. अबकारी करात कपात केल्यामुळे पेट्रोल (Petrol Price) प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर सलग सहा दिवस पेट्रोल, डिझेच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, दर स्थिर आहेत. दरम्यान केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रात देखील पेट्रोल, डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने इंधनाचे दर आणखी कमी झाल्याचे पहायला मिळाले. आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Delhi) प्रति लिटर 96.72 असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.
कच्च्या तेलाच्या दरात तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज कच्चे तेल 115 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. एकीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे भारतात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आल्याने हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात. भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी केले आहे.