Petrol Diesel Cheaper : कच्चा तेलात मोठी घसरण, लवकरच ही आनंदवार्ता येऊन धडकणार

Petrol Diesel Cheaper : महागाई कमी करण्यासाठी आणखी महत्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत मिळत आहे. गेल्या एक वर्षांपासून पेट्रोल-डिझेल जनतेला महागच मिळत आहे. त्यावर आता तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Cheaper : कच्चा तेलात मोठी घसरण, लवकरच ही आनंदवार्ता येऊन धडकणार
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 1:42 PM

नवी दिल्ली : 2023 चे सहा महिने उलटणार आहेत. या अर्ध्या वर्षात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) जागतिक बाजारात 14 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या पाच व्यापारी सत्रात ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय कच्चा तेलाचे भाव 3.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. येत्या काही महिन्यात जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याज दर वाढीचे संकेत दिले आहेत. परिणामी येत्या काही दिवसात कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसू शकते. तज्ज्ञांच्या मते, ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव वर्षाच्या दुसऱ्या सत्रात 65 ते 70 डॉलर दरम्यान असतील. या सर्व घडामोडींचा अर्थ पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) आघाडीवर दिलासा मिळण्याचे संकेत असल्याचे दिसून येते.

कच्चा तेलाची खबरबात जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती सातत्याने घसरणीवर आहेत. गेल्या दोन दिवसांत गुरुवार आणि शुक्रवारी कच्चा तेलाच्या किंमतीत 3 टक्क्यांची घसरण आली. डब्ल्यूटीआय भाव 3.5 टक्क्यांनी घसरले. आकड्यानुसार, 2023 मध्ये दोन्ही कच्चा तेलात एकत्रित 14 टक्के घसरण दिसून आली. आज 24 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 73.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 69.16 डॉलर प्रति बॅरल झाला होता. 22 जून रोजी या किंमती अनुक्रमे 77.04 डॉलर प्रति बॅरल आणि 72.47 डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या.

घसरण कशामुळे? जगभरातील केंद्रीय बँकांनी व्याज दरात वाढ करण्याचे संकेत दिले. गुरुवारी, बँक ऑफ इंग्लंडद्वारे व्याज दरात वाढ करण्यात आली. ब्रेंट क्रूडमध्ये जवळपास 3 डॉलर प्रति बॅरलची घसरण झाली. नॉर्वे आणि स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकांनी व्याज दर वाढवले आहे. अमेरिकन फेडरल बँकेने सध्या व्याज दर वाढवले नाही. येत्या काही महिन्यात व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. तर क्रूड ऑईलमध्ये घसरणीचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

भारतात कच्चा तेलाची स्थिती कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण सुरु आहे. दोन दिवसांपासून वायदे बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत 278 रुपयांची घसरण झाली. बुधवारी बाजार बंद होताना कच्चा तेलाच्या किंमती 5,953 रुपये प्रति बॅरलवर पोहचल्या होताा. शुक्रवारी बाजार बंद होताना 5,675 रुपये प्रति बॅरलवर पोहचल्या. शुक्रवारच्या व्यापारी सत्रात हा भाव 5,546 रुपये प्रति बॅरल झाला.

किती कमी होईल पेट्रोल-डिझेलचा भाव IIFL कमोडिटी आणि रिसर्च उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्यानुसार, केंद्रीय बँका सातत्याने आक्रमक धोरण ठेवत असल्याने जागतिक बाजारात कच्चा तेलावर दबाव आला आहे. किंमतीत घसरण दिसू येत आहे. येत्या काही दिवसात घसरणीचा ट्रेंड दिसू शकतो. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव 65 ते 70 डॉलर प्रति बॅरल दरम्यान असेल. भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होऊ शकते. भाव 10 ते 15 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.